चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा पतीनेच केला खून
Breaking News | Pune Crime: चारित्र्याच्या संशयावरूने पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची धक्कादायक घटना.
पुणे: पुण्यामध्ये वैष्णवी हगवणे हिचे आत्महत्या प्रकरण ताजे असताना वडगाव मावळमध्ये देखील अशीच एक घटना घडली आहे. विवाहित महिलांना हुंडाबळी आणि चारित्र्याचे संशय घेत मारहाण केली जात आहे. वडगाव मावळमध्ये चारित्र्याच्या संशयावरूने पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केला. या घटनेमुळे सर्वांनी रोष व्यक्त केला आहे. ही घटना शुक्रवारी (दि. 23) सकाळी 6:55 वाजण्यापूर्वी कोंडिवडे आं मा ता.मावळ हद्दीत घडली. यामुळे महिलांची सुरक्षा आणि न्याय हे मुद्दे चर्चेत आले आहेत.
या वडगाव मावळ मधील घटनेमध्ये सोनाबाई अशोक वाघमारे वय 33 वय रा. कोंडिवडे आं मा ता.मावळ खून झालेल्या पत्नीचे नाव आहे.तर अशोक बारकु वाघमारे वय 40 रा. परंदवडी ता.मावळ खून केलेल्या आरोपी पतीचे नाव आहे. पोलीस निरीक्षक कुमार कदम यांनी दिलेल्या माहितीनुसार आरोपी पती अशोक वाघमारे हा त्याच्या सासरी कोंडिवडे आं मा येथे पत्नी सोनाबाई वाघमारे हिच्या सोबत राहत होता. त्याला तीन मुलं आहेत.
महत्वाचे: नवनवीन फिचर मिळविण्यासाठी आजच आपला अॅप अपडेट करा. येथे क्लिक करा.
आरोपी पती अशोक वाघमारे त्याच्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेत होता. संशयावरून शुक्रवारी सकाळी 6:55 वा. वनक्षेत्राच्या ओढ्यावर दगडाने ठेचून खून केला. आरोपी स्वतः कामशेत पोलीस स्टेशनमध्ये हजर झाला. आरोपीला अटक करण्यात आली असून या गुन्ह्याचा अधिक तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार डोईजड करत आहेत.
Breaking News: Husband kills wife over suspicion of character