Home महाराष्ट्र धक्कादायक! पत्नीची हत्या करुन पतीने स्वतः केली आत्महत्या

धक्कादायक! पत्नीची हत्या करुन पतीने स्वतः केली आत्महत्या

Breaking News | Mumbai Crime: एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली.

Husband commits suicide after killing wife

खारघरमध्ये दुहेरी मृत्यूची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. एका व्यक्तीने त्याच्या पत्नीची हत्या करुन स्वतःचे आयुष्य संपवल्याची माहिती समोर आली आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट असून पोलीस याबाबत तपास करत आहेत. या दुहेरी मृत्यूकांडामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, संजय होलाराम सचदेव (वय ४५) याने ९ जून (सोमवार) रोजी सकाळी नऊ ते साडेदहा या सुमारास राहत्या घरात पत्नी सपना संजय सचदेव (वय ३५) हिचा धारदार चाकून गळ्यावर, पाठीवर आणि खांद्यावर वार करत हत्या केली. हत्येनंतर संजय सचदेवने स्वतःच्या गळ्यावरही वार करत आत्महत्येचा प्रयत्न केला.

पत्नीची हत्या केल्यानंतर स्वतःवर चाकूने वार केल्यानंतर संजय सचदेव गंभीररित्या जखमी झाला. घटनास्थळीच त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात सपनाच्या भावाने खारघर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी घटनास्थळी पोहोचत पुढील तपास सुरु केला. पत्नीची हत्या का केली यामागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असले तरी कौटुंबिक वादातून ही घटना घडल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवला जात आहे.

खारघरमधील डॉलफिन प्राईड, सेक्टर ३४ ए येथील एका फ्लॅटमध्ये एका व्यक्तीने त्याच्या पत्नीवर प्राणघाती हल्ला केला. धारदार चाकून तिच्या शरीरावर वार केले. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. त्यानंतर पतीने स्वतःच्या गळ्यावरुन चाकू फिरवला. गळ्यावर झालेल्या जखमांमुळे पतीचा देखील जागीच मृत्यू झाला. महिलेच्या भावाच्या फिर्यादीनंतर संपूर्ण प्रकरण उघडकीस आले.

Breaking News: Husband commits suicide after killing wife

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here