अकोले: झोपेतच अचानक घराला आग, जळून खाक, लाखोचे नुकसान
Breaking News | Akole: पहाटे गाढ झोपेत मागील बाजूस राहत असताना अचानक घराला आग लागली, घरातील वस्तूंनी पेट घेतला.
अकोले: केळुंगण येथील वृद्धाश्रमाच्या सर्वजण पहाटे गाढ झोपेत मागील बाजूस राहत असताना अचानक घराला आग लागली, घरातील वस्तूंनी पेट घेतला. त्यानंतर ही आग छपराला भिडली अन् होत्याचे नव्हते झाले. घरातील रामचंद्र मांगे व त्याची पत्नी अंजनाबाई, मुली संगीता, रंजना, मंगल, सुनीता मुलगा हरिदास यांनी अंगावरील कपड्यानिशी घराबाहेर धाव घेतली. त्यामुळे यांचे प्राण वाचले, मात्र डोळ्यादेखत घरदार व संसाराची राख झाली ते पाहून दोघे पती पत्नीसह मुले धाय मोकलून रडत होते. अकोले तालुक्यातील असलेल्या रामचंद्र हरी मांगे यांच्या घराला स्वांतत्र्य दिनी पहाटे आग लागून मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले. त्यानंतर याची माहिती माजी आमदार वैभव पिचड यांना मिळताच त्यांची भेट घेऊन झालेल्या घटनेची पाहणी केली आणि तातडीने मदत उपलब्ध करून देण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना केल्या.
तलाठी, ग्रामसेवक यांनी पंचनामा केला असून सुमारे एक लाख रुपयांचे नुकसान झाल्याचे त्यात नमूद केले आहे. अतिशय गरीब कुटुंब असून घराची राख झाल्याने त्यांनी एका मंदिरात आश्रय घेतला आहे. त्यांना लोकमदतीची गरज असून स्वेच्छेने सूर्यकांत देशमुख, मोबा. ८९७५४२५३८१ या क्रमांकावर मदत करावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
Web Title: house caught fire, burnt down, loss of lakhs while sleeping
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study