संगमनेरात ‘लव्ह जिहाद’च्या संशयातून हिंदू संघटना आक्रमक
Breaking News | Sangamner: घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले, हिंदू संघटना आक्रमक झाल्या.
संगमनेर : संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील आंबीखालसा गावच्या परिसरातील एका घटनेवरून कथित जिहादी प्रवृत्तीच्या विरोधात सकल हिंदू समाज, हिंदू संघटना व आंबीखालसा गावकरी शुक्रवारी (१२ जुलै) परिसरात कडकडीत बंद पाळून घारगावात एकवटले.
आंबीखालसा गावातील शनैश्वर मंदिरापासून हिंदू समाजबांधव पायी मूकमोचनि घारगाव बसस्थानक परिसरात पोहोचले. या वेळी जिहादी प्रवृत्ती विरोधात जनजागृतीसाठी जाहीर सभा घेतली.
घारगाव परिसरातील एका तरुणाने गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांची मदत घेऊन ७ जुलै रोजी साडेअकराच्या सुमारास घारगाव बसस्थानक परिसरातून एका तरुणीला पळवून नेले; परंतु घारगाव पोलिस ठाण्यात केवळ हरवल्याची नोंद करण्यात आली. या प्रकाराने हिंदू संघटना आक्रमक झाल्या आहेत. या घटनेचा निषेध व्यक्त केला जात होता. शेवटी हिंदू संघटनांनी आंदोलनाचा इशारा देताच घारगाव पोलिसांनी बुधवारी (१० जुलै) संबंधित तरुण व तरुणीला ताब्यात घेतले. त्यांचा जबाब नोंदविण्यात आला. मात्र त्यांनी प्रेमविवाह केल्याचे समोर आल्यानंतर त्यांना घारगाव पोलिसांनी बंदोबस्तात सुरक्षित व अज्ञात ठिकाणी पोहोचविल्याची माहिती समोर येत आहे.
दरम्यान, या घटनेच्या पार्श्वभूमीवर जनआक्रोश मोर्चा निघाला होता. या वेळी हा ‘लव्ह जिहाद’चा प्रकार असल्याचा आरोप हिंदू संघटनांनी केला आहे. या वेळी हिंदुत्ववादी संघटनांचे मिलिंद एकबोटे, गुलाब भोसले, योगेश सूर्यवंशी, बाळासाहेब ढोले, सुरेश कान्होरे, किशोर डोके, रोहिणी राऊत, कुलदीप ठाकूर, गजेंद्र घोडके, सुरेश कांडार, रमेश आहेर यांनी आमची मुलगी जशी गेली, तशी परत आणून द्या, तिला सुरक्षा या, अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरू, अवैध धंदे बंद करा, त्या तरुणाला अटक करा, त्याला फंडिंग कुठून आले याची चौकशी करा, त्या मुलीच्या काही मैत्रिणी त्या मुलाच्या संपर्कात असून त्यादेखील पळून जाणार असल्याचा संशय असून, त्यांची चौकशी करा आदी मागण्या या वेळी करण्यात आल्या.
Web Title: Hindu organization aggressive in Sangamanera due to suspicion of ‘love jihad’
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study