Home अहमदनगर शिर्डी येथे स्पा सेंटरवर चालणाऱ्या हाय प्रोफाईल रॅकेटवर,छापा चार परप्रांतीय पीडित मुलींची...

शिर्डी येथे स्पा सेंटरवर चालणाऱ्या हाय प्रोफाईल रॅकेटवर,छापा चार परप्रांतीय पीडित मुलींची सुटका

Shirdi Sex racket:  हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई.

High profile spa center racket, raid rescues four migrant girls

अहमदनगर: शिर्डी येथे पुन्हा एकदा चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून कारवाई केली आहे.  शिर्डी येथील द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली चालणाऱ्या हाय प्रोफाईल सेक्स रॅकेटवर पोलिसांनी छापा टाकून चार परप्रांतीय पिडीत मुलींची सुटका करून एक महिला आरोपीस ताब्यात घेतले आहे.

दि.21 डिसेंबर 2023 रोजी उपविभागीय पोलीस अधिकारी शिर्डी विभाग संदीप मिटके यांना शिर्डी येथील पिंपळवाडी रोडच्या बाजूस द युनिक स्पा सेंटरच्या नावाखाली हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट चालवून वेश्याव्यवसाय करून घेतल्या जात आहे. याबाबत खात्रीशीर माहिती मिळाली होती.

त्याप्रमाणे या ठिकाणी बनावट ग्राहक पाठवुन पंचासमक्ष छापा टाकुन 4 पिडीत परप्रांतीय मुलींची सुटका करण्यात आली, एक महिला एजंट आरोपीला ताब्यात घेण्यात आले असून आरोपीं विरुद्ध अनैतिक व्यापारास प्रतिबंध कायद्यानुसार महिला पोलीस कर्मचारी सुनंदा भारमल यांच्या फिर्यादीवरून शिर्डी पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

ही  कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला,श्रीमती.स्वाती भोर मॅडम अप्पर पोलीस अधीक्षक श्रीरामपूर यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके, पोलीस निरीक्षक सोपान शिरसाठ,सपोनि/योगिता कोकाटे,हेकॉ/इरफान शेख,हेकॉ/अशोक शिंदे,हेकॉ/बाबा खेडकर,मपोकॉ/ सुनंदा भारमल,पोना/श्याम जाधव,पोकॉ/दिनेश कांबळे,पोकॉ/सोमेश गरदास,चाहेकॉ/आप्पासाहेब थोरमिसे यांनी केली आहे.

Web Title: High profile spa center racket, raid rescues four migrant girls

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here