Indurikar Maharaj: इंदुरीकर महाराजांच्या त्या विधानाबाबतची सुनावणी या तारखेला
औरंगाबाद | Indurikar Maharaj: प्रसिद्ध प्रबोधनकार कीर्तनकार इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणावरील सुनावणी न्यायालयाने पुढं ढकलली आहे. आता 27 जानेवारीला पुढील सुनावणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.
इंदुरीकर महाराज यांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते. त्याविरोधात संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष अॅडव्होकेट रंजना गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.
तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी स्त्री भ्रूणहत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम 28 नुसार तक्रार दाखल केली.
न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना समन्स काढण्याचे आदेश दिले. त्याविरोधात इंदुरीकरांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. जिल्हा न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज मंजूर करत प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला. या विरोधात रंजना पगारे – गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.
Web Title: Hearing of Indurikar Maharaj’s statement on this date