Home अहमदनगर अहिल्यानगर: एका विहिरीत शीर आणि दुसरीकडे धड आढळले

अहिल्यानगर: एका विहिरीत शीर आणि दुसरीकडे धड आढळले

Breaking News | Ahilyanagar: बोधेगावात पहिलवान बाबा मंदिरातील सेवेकऱ्याचा खून.

head was found in one well and a torso in the other

शेवगाव: तालुक्यातील बोधेगाव येथील पहिलवान बाबा मंदिरातील ३० वर्षीय सेवेकरी पाच दिवसांपासून मंदिरातून अचानक गायच झाले होते. गुरुवारी (दि. ३०) सायंकाळी मंदिरानजीकच्या विहिरीत त्यांच्या शरीराचे धडापासून वेगळे केलेले शीर आढळले, तर शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी दुसन्या एका कोरड्या विहिरीत गाडून टाकलेल्या अवस्थेत धड सापडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या खूनप्रकरणी एका संशयितास ताब्यात घेतले असून पुढील तपास सुरु असल्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक धरमसिंह सुंदरडे यांनी सांगितले.

नामदेव रामा दहातोंडे (क्य ७०, रा. नागलवाडी, ता. शेवगाव) असे मृत सेवेकऱ्याचे नाव आहे. बोधेगावपासून उत्तरेस साधारण अडीच किलोमीटर अंतरावर एकहुरुजी ते पहिलवान वस्तीदरम्यान पहिलवान बाबांचे मंदिर आहे. मंदिरात नामदेव दहातोंडे १५ वर्षांपासून सेवेकरी म्हणून काम पाहत होते. मंदिरातून २६ जानेवारीपासून ते अचानक गायव झाल्याने याप्रकरणी पुजारी एकनाथ घोरतले यांनी शेवगाव पोलिसांत तक्रार दाखल केली होती.

कोरड्या विहिरीत आढळले धड..

पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने एका विहिरीतून शौर बाहेर काढले तर संबंधिताचे धड विहिरीतच असेल या शंकेने विहिरीतील पाणी पहाटे तीनपर्यंत दोन मोटारीने उपसले. मात्र, तरीही धड आढळून आले नाही. शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी शोध मोहिमेदरम्यान, स्थानिकांना माळरानावरील एका कोरडवा विहिरीतून दुर्गंधी येत असल्याचे समजले. त्यावेळी तिथे पोलिसांनी तपासले असता संबंधिताचे धड मातीत गाडून ठेवलेल्या अवस्थेत आढळले.

पाच दिवसांपासून बेपत्ता झालेल्या सेवेकऱ्याचा शोध लागत नसल्याने त्यांच्या कुटुंबीयांसह वंचित बहुजन आघाडीच्या वतीने पोलिसांना उपोषणाचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, सेवेकऱ्याचे रक्ताने माखलेले कपडे आढळून आले. गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास स्थानिकांना मंदिरानजीक दुर्गंधी येऊ लागल्याने नजीकच्या विहिरीत पाहिले असता, बेपत्ता झालेल्या सेवेकऱ्याचे धडापासून वेगळे केलेले शीर पाण्यावर तरंगताना आढळून आले. रात्री आठच्या सुमारास पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीने विहिरीतून शीर बाहेर काढले. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिस अधीक्षक राकेश ओला यांनी घटनास्थळी भेट देऊन तपासकामी पोलिसांना सूचना केल्या.

दुसऱ्या दिवशी सायंकाळी मंदिरापासून दीडशे मीटर अंतरावर एका कोरड्या विहिरीत गाहून ठेवलेल्या अवस्थेत सेवेकऱ्याचे धड आढळले. त्यानंतर विहिरीतून मृतदेह बाहेर काढून उत्तरीय तपासणीसाठी अहिल्यानगर येथे पाठविण्यात आले. मृत पूजारी हे  नऊ महिन्यांपूर्वी पहिलवान बाबा मंदिरात घडलेल्या मूर्ती विटंबनाप्रकरणी दाखल गुन्ह्याचे फिर्यादी होते.

घटनास्थळी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रशांत खैरे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुनील पाटील, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे दिनेश आहेर, पोलिस निरीक्षक समाधान नांगरे, धरमसिंह सुंदरडे, अशोक काटे तळ ठोकून होते.

Web Title: head was found in one well and a torso in the other

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here