अहमदनगर: गुटखा दिला नाही, डोक्यात काठी घालून एकाची हत्या
Ahmednagar News: गुटखा न दिल्याने एका परप्रांतीय मजुराचा खून (Murder) झाल्याची खळबळजनक घटना.
अहमदनगर : गुटखा न दिल्याने एका परप्रांतीय मजुराचा खून झाल्याची खळबळजनक घटना आरणगाव (ता. नगर) शिवारात गुरुवारी (दि. १२) रात्री नऊ वाजेच्या सुमारास घडली.
अजय रामरुम चौधरी (वय २२, रा. मूळचा उत्तर प्रदेश, हल्ली मुक्काम आरणगाव, ता. नगर) असे मयताचे नाव आहे. याप्रकरणी एकावर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तेजनारायण अर्जुन तांते (मूळ रा. बिहार, हल्ली मुक्काम आरणगाव, ता. नगर) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत शैलेंद्र आहे. सुरेश यादव यांनी फिर्याद दिली आहे. अहमदनगर येथील बायपास रस्त्याचे काम सुरू आहे. हे काम जीएचव्ही कंपनीने घेतलेले आहे. या कंपनीत मजूर म्हणून काम करत असलेल्यांवरील आरोपी याने मयत चौधरी याच्याकडे गुटखा मागितला होता. त्यांनी तो दिला नाही. यातून दोघांमध्ये जोराचे भांडण झाले. आरोपीने जवळच असलेली लाकडी काठी उचलून चौधरी यांच्या डोक्यात घातली. त्यात त्यांचा जागीच मृत्यू झाला, असे फिर्यादीत म्हटले आहे.
ग्रामीण विभागाचे पोलिस उपअधीक्षक संपत भोसले यांच्यासह नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरिक्षक शिशिरकुमार देशमुख यांनी घटनास्थळी भेट देऊन माहिती घेतली. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक युवराज चव्हाण करत आहेत.
Web Title: Gutkha was not given, one was Murder with a stick on the head
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App