गटविकास अधिकाऱ्यास दमबाजी, माजी सभापती नाहटा यांना अटक
श्रीगोंदे | Shrigonde: तालुक्यातील लोणी व्यंकनाथ ग्रामपंचायतमधील अनियमित कामामध्ये ग्रामपंचायत सरपंच रामदास ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई करणे संदर्भात प्रस्ताव का केला अशी विचारणा करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांना बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेव नाहटा यांनी शिवीगाळ व दमबाजी केली. करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांच्या दिशेने बूट फिरकाविला. याप्रकरणी श्रीगोंदा पोलीस ठाण्यात करत पंचायत समितीचे गटविकास अधिकारी प्रशांत काळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बाळासाहेब नाहटा यांना पोलीस निरीक्षक रामराव ढिकले यांनी अटक केली आहे.
लोणीव्यंकनाथ ग्रामपंचायतमधील विकास कामात अनेक अनियामियता असल्याची तक्रार एका नागरिकाने केली होती. त्याआधारे गटविकास अधिकारी प्रशांत काळे चौकशी अहवाल तयार केला आणि ठोंबरे यांच्यावर अपात्रेची कारवाई संदर्भात जिल्हा परिषद अधिकाऱ्यांकडे पाठविण्याच्या हालचाली सुरु झाल्याने बाजार समितीचे माजी सभापती बाळासाहेब नाहटा यांना समजले. ते सोमवारी श्रीगोंदा पंचायत समितीत आले आणि गटविकास अधिकारी काळे याना विचारणा केली की, तुम्ही आमच्या सरपंचावर अपात्रेची कारवाई का करता यातून शाब्दिक चकमक झाली. नाहटा यांनी गटविकास अधिकारी काळे यांच्या अंगावर धावत शिवीगाळ व दमबाजी केली. तसेच त्यांच्या दिशेला बूट फिराकाविला. याप्रकरणी गटविकास अधिकारी यांनी श्रीगोंदे पोलीस स्टेशन धाव घेतली.
Web Title: Shrigonde Group development officer arrested former chairman Nahta arrested