राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोरोनाची लागण
मुंबई: राज्यपाल भगतसिंह कोशारी यांना कोरोनाची लागण झाल्याची माहिती समोर आली आहे. त्यांच्यावर रिलायंस रुग्णालयात उपचार सुरु आहेत. राज्यपालांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. त्यांना कोरोना सदृश्य लक्षणे दिसू लागल्याने त्यांनी करोना चाचणी केली.
राज्यात एकीकडे कोरोना रुग्णसंख्या वाढत असताना दिसून येत असताना राजकीय वारे जोरदार वाहत आहे. एकनाथ शिंदे हे दुपारी राज्यपालांची भेट घेणार होते. या भेटीदरम्यान महत्वपूर्ण घडामोडी घडतील अशी शक्यता होती. पण त्या आधीच हा प्रकार समोर आल्याने आता एकनाथ शिंदे मुंबईला जाणार का हे पाहणं महत्वाच ठरणार आहे.
Web Title: Governor Bhagat Singh Koshari infected with corona