तरुणी क्लासला जाते सांगून घरातून गेली ती परतलीच नाही, नदीत मृतदेह आढळला
Breaking News | Pune Crime: एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ.
पुणे : पुण्यातील राजगुरुनगर येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. राजगुरुनगर येथील एका महाविद्यालयीन तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला असल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पिडित युवतीचा मृतदेह मांजरेवाडी येथे भिमा नदीच्या पात्रात आढळला असून सोबत असलेली बॅग बाजूच्या विहिरीत आढळून आली आहे.
‘कॉलेजच्या क्लासला चालले’ असं सांगून ती घरातून निघालेली होती, परंतु तरुणी परतली नाही. नातेवाइकांनी राजगुरुनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता असल्याची तक्रार नोंदवली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवल्यानंतर तरुणीचा मृतदेह भीमा नदीच्या पात्रात आढळला. पीडित तरुणीचा खून झाल्याचं पोलिसांनी प्राथमिक अंदाच वर्तवला आहे. आपेक्षा वसंत मांजरे असं मृत तरुणीचं नाव आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: going to class but never returned, her body was found in the river