सैराटची पुनरावृत्ती: बहिणीसोबत प्रेमप्रकरण मुलीच्या भावाने केली प्रियकराची हत्या
Aurangabad Murder Case: प्रेमसंबंधाच्या कारणातून युवकाची हत्या.
औरंगाबाद: औरंगाबाद येथे धक्कादायक कृत्य समोर आले आहे. सैराटची पुनरावृत्ती पाहायला मिळाली आहे. जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील टापरगावात ही घटना समोर आली आहे. बहिणीसोबत प्रेमकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने एका युवकाचा हत्या केल्याची घटना घडली आहे. या घटनेने टापरगावात परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बहिणीसोबत प्रेमप्रकरण असल्याच्या कारणावरून मुलीच्या भावाने प्रियकर विशाल रमेश लव्हाळे याचा निर्घुण हत्या केली आहे. तर या प्रकरणी मुख्य आरोपी कृष्णा दिगंबर पवार (चिंचोली, ता. खुलताबाद) याला अटक केली आहे. विशाल रमेश लव्हाळे याचे गावातील कृष्णा पवार याच्या बहिणीसोबत प्रेम संबंध होते. कृष्णाला याची माहिती समजताच त्याला विशालचा भरपूर राग आला. त्यांने आपल्या वडिलांच्या मोबाईलवरून विशालला फोन करून बोलवून घेतले. यानंतर विशालला लाकडी दांड्याने बेदम मारहाण केली. यात विशाल गंभीर जखमी झाला. घरी आल्यानंतर तो जागेवरच कोसळला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. प्रकरणी कन्नड ग्रामीण पोलिसांनी आरोपी कृष्णा पवार याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.
Web Title: girl’s brother Murder her lover after having an affair with her sister