अहिल्यानगर: रस्त्यात अडवून तरुणीचा विनयभंग
Breaking News | Ahilyanagar Crime: तु माझ्यासोबत लग्न कर, नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन, अशी धमकी देत एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना.
अहिल्यानगर : रस्त्यात अडवून हात धरून बाजूला घेऊन तु माझ्यासोबत लग्न कर, नाही तर तुझे फोटो व्हायरल करीन, अशी धमकी देत एका २२ वर्षीय तरुणीचा विनयभंग केल्याची घटना रविवारी (दि. २३) रात्री साठेआठ वाजेदरम्यान नगर शहरात घडली.
याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल झाला आहे. आकाश सुरेश वायकर (रा. बोल्हेगाव गावठाण, अहिल्यानगर) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. रविवारी रात्री एक २२ वर्षीय तरुणी दुचाकीवरून जात होती. त्यावेळी आरोपीने तरुणीच्या दुचाकीला वाहन अडवे लावून तिला थांबविले. हात पकडून तिचा विनयभंग केला.
Web Title: girl was molested by stopping her on the road