मॉडेलिंगची छायाचित्रे प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार
Pune rape Case: मॉडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कार केल्याची घटना.
पुणे: मॉडेलिंगची छायाचित्रे समाजमाध्यमात (Social Media) प्रसारित करण्याची धमकी देऊन तरुणीवर बलात्कारकेल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी चंदननगर पोलिसांनी एकास अटक केली आहे.
करण अण्णा पगारे (वय २५, मूळ रा. सामनगाव, नाशिक, सध्या रा. सोमनाथनगर, वडगाव शेरी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका तरुणीने चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, तरुणी आणि आरोपी करण ओळखीचे आहेत. नाशिक येथे एका मॉडेलिंगसाठी तरुणीसाठी छायाचित्रे काढण्यात आली होती. करण सध्या पुण्यात राहायला आहे. नाशिकमध्ये मॉडेलिंगसाठी काढलेले छायाचित्रे नातेवाईक, आई-वडील, तसेच समाजमाध्यमात प्रसारित करण्याची धमकी देऊन करण याने तरुणीवर वडगाव शेरी भागातील एका हॉटेलात बलात्कार केला.
त्यानंतर तरुणीला करणने धमकावले. माझ्याशी संबंध न ठेवल्यास जातीवाचक शिवीगाळ केल्याची तक्रार करण्याची धमकी दिली. समाजमाध्यमात छायाचित्रे प्रसारित करुन बदनामी करण्याची धमकी त्याने दिली. तरुणीने त्याला नकार दिला. तेव्हा करणने छायाचित्रे तिच्या वडिलांना पाठविली. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक काळे अधिक तपास करत आहेत.
Web Title: Girl rape by Threatening to publish modeling pictures
See also: Latest Marathi News, Ahmednagar News, Education Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App