घारगाव पोलीस ठाण्यातील महिलेवर अत्याचार करणाऱ्या पोलीसाला अटक
संगमनेर |Ghargaon : लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार करणाऱ्या घारगाव पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी सुनील यशवंत रत्नपारखी याला पोलिसांनी पुणे जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यातील मंचर येथे शुक्रवारी दिनांक २५ रोजी ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे.
याबाबत संगमनेर उप विभागाचे उप विभागीय पोलीस अधिकारी राहुल मदने यांनी माहिती दिली आहे.
सुनील यशवंत रत्नपारखी याच्याविरोधात पिडीत महिलेने फिर्याद दाखल केली असून त्यावरून घारगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रत्नपारखी हा फरार होता. रत्नपारखी याची काही महिन्यांपूर्वी संकेत स्थळाच्या माध्यमातून विवाह जुळविण्यासाठी एका घटस्फोटीत महिलेशी ओळख झाली होती. त्याने या महिलेला आमिष दाखवून तिच्याशी संबंध ठेवले होते. या काळात महिला गरोदर राहिली होती. या महिलेचा दोन वेळा गर्भापात करण्यात आला होता. आळे येथील निरामय हॉस्पिटल येथे एकदा गर्भापात केला होता. याप्रकरणी चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील अमोल कर्जुले यास अटक करण्यात आलेली आहे. तो सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. गर्भपात केल्या प्रकरणी डॉ. व्ही. जी. मेहेर निरामय हॉस्पिटल आळे हा अजून फरार आहे. तर शुक्रवारी आरोपी पोलीस कर्मचारी यास अटक करण्यात आली आहे.
Web Title: Ghargaon police arrested a woman for torturing a woman