Home अहमदनगर अहमदनगर: पैशाच्या वादातून मित्रानीच केला मित्राचा निर्घुण खुन

अहमदनगर: पैशाच्या वादातून मित्रानीच केला मित्राचा निर्घुण खुन

Breaking News | Ahmednagar: पैशाच्या वादातून मित्राने मित्राचा निघृण खून केल्याचे सत्य अखेर उघडकीस.

friend committed a murder of a friend due to a money dispute

कोपरगावः पैशाच्या वादातून मित्राने मित्राचा निघृण खून केल्याचे सत्य अखेर उघडकीस आले आहे. तब्बल १४ महिन्यांनंतर अकस्मात मृत्यूप्रकरणाच्या तपासाअंती पोलिसांनी खुनाच्या गुन्ह्याची उकल केली.

कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद दाखल झाली होती, मात्र मृत अभिजीत राजेंद्र सांबरे (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) याचा मृत्यू संशयास्पद झाल्याची नातेवायिकांनी तक्रार केली होती. गुन्हे शाखेचे पोलिस हवालदार मनोहर शिंदे, अखेर अकस्मात मृत्यूचा झाला उलगडा विशाल कुंवर, सोमनाथ वाजे, तेजस मते व महेश खांडबहाले यांनी शिताफीने संशयित प्रमोद रणमाळे याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान त्याने खून केल्याची कबुली दिली आहे. २७ जुन २०२३ रोजी आर्थिक व्यवहारासाठी मृत अभिजीत सांबरे हा येवला (जि. नाशिक) येथे जाणार होता. त्याने मित्र प्रमोद रणमाळे याला तेथे येण्यास सांगितले होते. रणमाळे याने मृत अभिजीत सांबरे याच्या दारू पिण्याच्या सवयीचा फायदा घेत रात्रीच्या सुमारास खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

त्याला ब्लड प्रेशरसह झोपेच्या अतिरीक्त मात्रेमध्ये गोळ्या मिसळून त्याला दारू पाजली. यामुळे मृत अभिजीत सांबरे गंभीर झाल्याने त्याला बुलेट दुचाकीवर मागे बसवून येवला येथून संभाजीनगर रस्त्यावरुन वैजापुरजवळून कोपरगाव रस्त्यावर नेले. मृत अभिजीत सांबरेची शुध्द हरपल्याचा अंदाज घेत रस्त्याच्याकडेला फेकून पोबारा केला होता, अशी कबुली आरोपी रणमाळे दिली आहे. याप्रकरणी कोपरगाव तालुका पोलिस ठाण्यात त्याच्याविरुद्ध पोलिस आयुक्त संदीप कर्णिक, पोलिस उपायुक्त प्रशांत बच्छाव, सहाय्यक पोलिस आयुक्त संदीप मिटके, पोलिस निरीक्षक विद्यासागर श्रीमनवार (नाशिक) यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलिस निरीक्षक समाधान हिरे, यशवंत बेंडकोळी, पोलिस हवालदार मनोहर शिंदे, प्रकाश महाजन, चंद्रकांत गवळी, वाल्मीक चव्हाण, विशाल कुंवर, समाधान वाजे, तेजस मते, महेश खांडबहाले, स्वप्नील गुंद्रे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.

Web Title: friend committed a murder of a friend due to a money dispute

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here