Home अहमदनगर अहमदनगर: मुले पळविणारी टोळी समजून चार जणांना मारहाण

अहमदनगर: मुले पळविणारी टोळी समजून चार जणांना मारहाण

Breaking News | Ahmednagar: गावोगाव फिरून भांडी विक्री करणाऱ्या चौघा परप्रांतीय तरुणांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप.

Four people were beaten up as a gang of child abductors

पाथर्डी : मुले पळविणारी टोळी समजून पाथर्डी तालुक्यातील गीतेवाडी येथे गुरुवारी (दि. १२) सकाळी गावोगाव फिरून भांडी विक्री करणाऱ्या चौघा परप्रांतीय तरुणांना ग्रामस्थांनी चांगलाच चोप दिला. त्यांना शाळेच्या खोलीत कोंडूनही ठेवले होते.

गितेवाडी येथे गुरुवारी सकाळी चार परप्रांतीय तरुण प्राथमिक शाळा परिसरात कूकर भांडी विक्री करण्यासाठी आले होते. त्यांनी शाळा परिसरातील काही विद्यार्थ्यांना जवळ बोलाविण्याचा प्रयत्न केला. हा संपूर्ण प्रकार परिसरातील सीसीटीव्हीत कैद झाला. शाळेतील विद्यार्थ्यांना या अज्ञात तरुणांकडून पळून नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय काही ग्रामस्थांना आला. त्यांनी त्या तरुणांना चोप देऊन शाळेच्या एका खोलीत कोंडून ठेवले. या तरुणांबद्दल पाथर्डी पोलिसांना माहिती कळविली. त्यानंतर काही वेळातच मिरी पोलिस चौकीचे पोपट आव्हाड गीतेवाडीत दाखल झाले. त्यांनी चार तरुणांना ताब्यात घेऊन अधिक माहितीसाठी पाथर्डी पोलिस ठाण्यात नेले. पोलिसांनीही या चार तरुणांकडे कसून चौकशी केली. ते परप्रांतीय असून, मुले पळविणारे नाहीत. ते गावोगाव कूकर, भांडी विक्रीसाठी फिरत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Web Title: Four people were beaten up as a gang of child abductors

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here