Home संगमनेर पार्थ पवार जमीन प्रकरणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा गौप्यस्फोट

पार्थ पवार जमीन प्रकरणी माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरातांचा गौप्यस्फोट

Breaking News | Parth Pawar land case and Balasaheb Thorat: पार्थ पवार जमीन प्रकरणी मी महसूल मंत्री असताना दोन-तीनवेळा माझ्याकडे फाईल आली होती. उच्च न्यायालयातही जावून आली, पण मी योग्य निर्णय घेऊन नाकारली असल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

Former Revenue Minister Balasaheb Thorat's revelation in Parth Pawar land case

संगमनेर:  पार्थ पवार जमीन प्रकरणी मी महसूल मंत्री असताना दोन-तीनवेळा माझ्याकडे फाईल आली होती. उच्च न्यायालयातही जावून आली, पण मी योग्य निर्णय घेऊन नाकारली असल्याचा गौप्यस्फोट माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केला.

संगमनेरातील सुदर्शन निवासस्थानी माध्यमांची प्रतिनिधींनी माजी मंत्री थोरात यांच्याशी पार्थ पवार जमीन प्रकरणी संवाद साधला तेव्हा ते म्हणाले, कोणीही महसूल मंत्री झाले तरी महाराष्ट्रातले विषय परत परत त्यांच्याकडे येत असतात. विशेषतः सरकारी जमीन लाटण्याचा अनेक मंडळी प्रयत्न करत असतात. तेव्हा आपणच रखवालदार असल्याने काळजीपूर्वक निर्णय घ्यावे लागतात. तसे निर्णय मी घेतलेले आहे. मी घेतलेले निर्णय उच्च व सर्वोच्च न्यायालयात कायम राहिल्याचे दिसलेले आहे. या प्रकरणाची फाईल देखील माझ्याकडे दोन-तीनवेळा आली होती. परंतु, मी योग्य निर्णय घेऊन नाकारत होतो.

मात्र, एवढी मोठी महत्त्वाची जागा अशाप्रकारे दिल्या जाते हे अत्यंत आश्चर्यकारक आणि दुर्दैवी आहे. अजित हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहे तरी अशी गोष्ट घडते. अशोक चव्हाण, विलासराव देशमुख यांनी असा काय गुन्हा केला होता की त्यांना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. तेव्हा आपण सत्तेत असताना काळजी घेतली पाहिजे. जनतेचे प्रतिनिधी म्हणून निर्णय घेताना काळजी घेणे आवश्यक आहे. सत्ताधारी असला तरी धाक असला पाहिजे तो काँग्रेसने कायम पाळला. आता भाजपची जबाबदारी आहे कसे प्रशासन चालवायचे, अशी भूमिका त्यांनी मांडली.

Breaking News: Former Revenue Minister Balasaheb Thorat’s revelation in Parth Pawar land case

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here