Home पुणे माजी खासदाराच्या मुलाची आत्महत्या

माजी खासदाराच्या मुलाची आत्महत्या

Pune Suicide News: आंबेगाव तालुक्यातील माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना.

Former MP's son commits suicide

पुणे : आंबेगाव तालुक्यातील माजी खासदार किसनराव बाणखेले यांच्या मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. याप्रकरणी मंचर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली.

विकास किसनराव बाणखेले (वय ५२, रा. मंचर, ता. आंबेगाव, जि. पुणे) असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे. पोलिसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की,  विकास बाणखेले गुरुवारी सकाळी नेहमीप्रमाणे फेरफटका मारण्यासाटी बाहेर पडले. त्यानंतर ते छत्रपती शिवाजी महाराज चौकात मित्रांना भेटले. मित्रांबरोबर गप्पा मारुन ते घरी गेले. खोलीत गेल्यानंतर ते बाहेर आले नाहीत. त्यांचे मोठे भाऊ रामदास यांनी त्यांना जेवण करण्यासाठी हाक मारली. मात्र ते खोलीतून बाहेर आले नाही. त्यामुळे त्यांना संशय आला. खोलीचा दरवाजा उघडण्यात आला. तेव्हा विकास यांनी वायरच्या सहायाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले.

या घटनेची माहिती बाणखेले कुटुंबीयांनी पोलिसांना दिली. मंचर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. घटनास्थळाची पाहणी करण्यात आली. बाणखेले यांनी आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी किंवा मोबाइलवरुन कोणाला संदेश पाठविला नव्हता. त्यांच्या आत्महत्येमागचे कारण समजू शकले नाही. याप्रकरणी अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली, अशी माहिती मंचर पोलिसांनी दिली. पोलीस हवालदार सुमीत मोरे तपास करत आहेत. विकास बाणखेले यांच्यामागे आई, पत्नी, मुलगा, भाऊ असा परिवार आहे. दिवंगत खासदार किसनराव बाणखेले यांचे ते धाकटे चिरंजीव होते. बाणखेले यांच्या आकस्मिक निधन झाल्याची माहिती मिळताच मंचर परिसरात शोककळा पसरली आहे.  

Web Title: Former MP’s son commits suicide

See also: Latest Marathi News,  Breaking News liveSangamner NewsAhmednagar News

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here