पारोळा तालुक्यातील वन विभागातील महिलेवर बलात्कार (Raped) करून मारहाण केल्याची घटना.
जळगाव : पारोळा तालुक्यातील वन विभागातील महिलेवर बलात्कार करून मारहाण केल्याप्रकरणी प्रौढाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
एका २९ वर्षीय महिलेवर समाधान लोटन चौधरी (३६, राजीव गांधीनगर, पारोळा) याने गेल्या चार ते पाच वर्षांपासून धमकावत बलात्कार केला. या महिलेने त्याच्याशी बोलणे बंद केले तरी त्याने २५ मार्चला महिलेच्या घरात घुसून बलात्कार केला व तक्रार केल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर ८ एप्रिलला ही महिला वरिष्ठांच्या आदेशान्वये वसंतवाडी येथे एका प्रकरणात पंचनाम्यासाठी जात असताना चौधरी याने महिलेला रस्त्यात अडवून तिला मारहाण केली व तक्रार दिल्यास फोटो व्हायरल करून चेहरा विद्रूप करण्याची धमकी दिली.
Web Title: Forest guard woman raped
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App