Home परभणी सेफ्टी टँकमध्ये गुदमरून पाच जणांचा मृत्यू, मृत एकाच कुटुंबातील

सेफ्टी टँकमध्ये गुदमरून पाच जणांचा मृत्यू, मृत एकाच कुटुंबातील

Parbhani News: सेफ्टी टँक सफाईचे काम करताना रात्री गुदमरून पाच जणांचा मृत्यू (died) झाल्याची घटना.

Five people died after suffocation in the safety tank

सोनपेठ | परभणी : तालुक्यातील भाऊचा तांडा शेतशिवारात सेफ्टी टँक सफाईचे काम करताना गुरुवारी रात्री गुदमरून पाच जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यात एक बेशुद्धावस्थेत असल्याने त्यास परळीच्या रुग्णालयात दाखल केले.

भाऊचा तांडा येथील मारोती राठोड यांनी फार्महाउसमधील सेफ्टी टैंक सफाईला कामगारांना बोलावले होते. काम करताना एक जण टँकमध्ये बेशुद्ध पडला. त्याला वाचविण्यासाठी एकेक करून सर्व जण आत गेले; पण त्यात पाच जणांचा गुदमरून मृत्यू झाला. शेख सादेक (५८), शेख शाहरुख (२८) शेख जुनेद (३२), शेख नवीद (२८), शेख फिरोज (२७), अशी मृतांची नावे असून, शेख साबेर यांची प्रकृती गंभीर आहे. हे सर्व मयत एकाच कुटुंबातील आहेत. या घटनेमुळे हळहळ व्यक्त  होत आहे.

प्रत्येकी १० लाख मदत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या घटनेवर दुःख व्यक्त केले असून, मृतांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपये देण्याचे निर्देश दिले आहेत. जखमी कामगारावरील उपचाराचा संपूर्ण खर्च शासनाकडून देण्याचे निर्देशही त्यांनी दिले.

Web Title: Five people died after suffocation in the safety tank

Sangamner Akole News Whats app Marketing

See also: Latest Marathi NewsAhmednagar NewsEducation Study and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here