धक्कादायक! पाण्याने भरलेल्या खड्ड्यात पाच जणांना जलसमाधी, एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश
Breaking News | Nagpur: कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्ड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली.
नागपुर : फिरायला जात आहोत, असे सांगून नागपूर येथून कुही फाट्यालगत गिट्टी खदानच्या खोल खड्ड्यात पाच जणांना जलसमाधी मिळाली. मृतकांमध्ये एकाच कुटुंबातील चार जणांचा समावेश असून दोन महिला, मुलगा, मुलगी यांचा समावेश आहे.
रज्जु उर्फ रंजना सूर्यकांत राऊत (२२, नागपूर), रोशनी चंद्रकांत चौधरी (३२), मोहीत चंद्रकांत चौधरी (१०),
लक्ष्मी चंद्रकांत चौधरी (८, तिघेही रा. लक्ष्मी नगर धुळे) व एहतेशाम मुक्तार अन्सारी (२०, नागपूर) यांचा मृतांत समावेश आहे. पाचही जण याठिकाणी पोहताना ही घटना घडली असावी, असा प्राथमिक अंदाज वर्तविला जात आहे.
सूर्यकांत राऊत हे चहा टपरीवर काम करतात. त्यांच्याकडे गृहप्रवेश होता. त्यासाठी त्यांची धुळे येथील मुलगी रोशनी कुटुंबियांसह ४ मे रोजी माहेरी आली.
रविवारी दुपारी २ वाजता रोशनी, मुलगा मोहीत, मुलगी लक्ष्मी आणि लहान बहिण रंजना हिच्यासह घरून निघाले.
लोकेशन कळले, प्रेत सापडले
रात्री उशीरापर्यंत परत न आल्याने वडील सूर्यकांत यांनी पोलिसांकडे हरविल्याची तक्रार नोंदविली. दुसरीकडे या कुटुंबीयांसमवेत एहतेशाम हा सुद्धा गेला होता. तो सुद्धा परत न आल्याने कुटुंबीयांनी पोलिस ठाणे गाठले होते. तक्रार मिळताच पोलिसांनी तातडीने सायबर विभागाला सूचना केली. सोमवारी सकाळी कुही फाट्यालगत असलेला गिट्टी खदान परिसर ट्रेस झाला.
कुटुंबिय आणि पोलीस घटनास्थळी पोहोचले. 3 रोशनी हिचे प्रेत पाण्यावर तरंगताना आढळून आले. गिट्टीखदानच्या कडेला एक दुचाकी, चप्पलचे जोड आणि कपडे पडून होते. ओळख पटली. अन्य चार जणांचे प्रेत गोताखोरच्या माध्यमातून बाहेर काढण्यात आले.
मुलगा आणि मुलीचे कपडे गिट्टीखदानीच्या काठावर होते. एकमेकांना वाचविण्यात अन्य लोकांचा जीव गेला असावा, असा अंदाज आहे.
Breaking News: Five death Paach Janna Jal Samadhi, filled with water