Home नाशिक कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे पाच डबे घसरले, वाहतूक ठप्प

कसारा स्थानकाजवळ मालगाडीचे पाच डबे घसरले, वाहतूक ठप्प

Kasara Railway Accident:  इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे पाच डबे घसरले.

Five coaches of a freight train derailed near Kasara station

कसारा | ठाणे : इगतपुरीच्या दिशेने जाणाऱ्या मालगाडीचे पाच डबे घसरले. हा अपघात रविवारी सायंकाळी सव्वासातच्या सुमारास कसारा रेल्वे स्थानकाजवळ झाला. त्यापैकी दोन डब्यांचे कपलिंग तुटल्याने ते दुसऱ्या रेल्वे मार्गावर उलटले. यामुळे नाशिककडे आणि नाशिकहून मुंबईला जाणारी वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली आहे. दरम्यान, वाहतूक पूर्ववत करण्यासाठी रेल्वे प्रशासन प्रयत्न करीत आहेत.

या अपघाताची माहिती मिळताच रेल्वे प्रशासन व अपघात नियंत्रण पथक, रेल्वे पोलिस, रेल्वे सुरक्षा दलाचे अधिकारी, कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. दरम्यान, नाशिककडे जाणारी वाहतूक सुरळीत करण्यासाठी तीन ते चार तासांहून अधिक काळ लागू शकतो, अशी माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी सायंकाळी दिली.

मालगाडी घसरल्याने नाशिकच्या दिशेने जाणाऱ्या नंदिग्राम एक्स्प्रेस, पंचवटी, राज्यराणी, विदर्भ, पंजाब मेल यासह लांब पल्ल्याच्या अन्य गाड्या कसारा ते टिटवाळा स्थानकादरम्यान थांबवून ठेवण्यात आल्या आहेत.

लांब पल्ल्याच्या काही गाड्या पुणे-दौडमार्गे, वसई-विरारमार्गे वळवण्यात आल्या आहेत, अशी माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.

 नाशिकहून मुंबईला जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या गाड्या काही काळ थांबविण्यात येणार असल्याचे रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले.

दरम्यान, अपघात कसा झाला, याबाबत चौकशी करण्याचे आदेश रेल्वेच्या महाव्यवस्थापकांनी दिले आहेत.

Web Title: Five coaches of a freight train derailed near Kasara station

See also: Latest Marathi NewsSangamner NewsAhmednagar NewsEducation Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here