Home चंद्रपूर भरदिवसा पुन्हा गोळीबार; कुख्यात गुंडाची हत्या

भरदिवसा पुन्हा गोळीबार; कुख्यात गुंडाची हत्या

Breaking News | Chandrapur Firing: एका हॉटेलमध्ये सोमवारी भरदुपारी कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर काही जणांनी गोळीबार.

Firing again in broad daylight Killing of a notorious gangster

चंद्रपूर : शहरातील बिनबा गेट परिसरातील एका हॉटेलमध्ये सोमवारी भरदुपारी कुख्यात गुंड शेख हाजी बाबा शेख सरवर याच्यावर काही जणांनी गोळीबार केला.

दोन गोळ्या लागल्यानंतर हाजी सरवर हॉटेलमधील किचनकडे पळू लागला. यावेळी त्याला चाकूने भोसकले. रक्तबंबाळ अवस्थेत त्यास जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल केले असता, डॉक्टरांनी मृत घोषित केले. यावेळी हाजीचा एक साथीदारही जखमी झाला. सततच्या गोळीबाराच्या घटनांमुळे चंद्रपूर शहर पुन्हा हादरून गेले आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने पाच जणांना अटक केली आहे. कोळसा तस्करी व अवैध धंद्यातील वर्चस्वाच्या लढाईतून हे हत्याकांड झाले असावे, असे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

समीर शेख, श्रीकांत कदम (दोघेही रा. दिग्रस), नीलेश अलीयास उर्फ पिंटू (रा.नागपूर), प्रशांत मलवेनी, राजेश मुलकलवार नकोडा असे अटकेतील आरोपींची नावे आहेत.

Web Title: Firing again in broad daylight Killing of a notorious gangster

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here