Home नाशिक हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग, पतीला मारहाण, नेमकं काय घडलं?

हॉस्पिटलमध्ये महिला रुग्णाचा विनयभंग, पतीला मारहाण, नेमकं काय घडलं?

Breaking News | Nashik Crime:  रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा तिच्याच वॉर्डात एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग करून तिच्यासह तिच्या पतीला देखील मारहाण करण्याची धक्कादायक घटना.

Female patient molested in hospital

नाशिक : पालिकेच्या नाशिकरोड येथील हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे रुग्णालय अर्थात बिटको रुग्णालयात डॉक्टरांना आणि कर्मचाऱ्यांना रुग्णाच्या नातेवाईकांनी मारहाण केल्याची घटना ताजी असतानाच याच रुग्णालयात उपचारासाठी दाखल महिला रुग्णाचा तिच्याच वॉर्डात एका अनोळखी व्यक्तीने विनयभंग करून तिच्यासह तिच्या पतीला देखील मारहाण करण्याची धक्कादायक घटना घडल्याचे उजेडात आल्याने बिटको रुग्णालयातील सुरक्षा व्यवस्थेचे अक्षरशः धिंडवडे उडाले असल्याचे स्पष्ट झाले आहे. हा प्रकार सोमवारी रात्री साडे नऊ वाजता घडला असून पिडीत महिलेने दिलेल्या फिर्यादीवरून नाशिकरोड पोलीस ठाण्यात संशयित इसमाच्या विरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फिर्यादी महीला बिटको रुग्णालयात उपचारासाठी दाखल होती. संशयित अनोळखी इसम हा तिच्या वॉर्डाच्या दरवाजाच्या समोरून चकरा मारीत होता. त्याने या महिला रुग्णाला डोळा मारला आणि तिच्या जवळ येवून बसला. संशयिताने तिला जेवण केले का, जेवण करायचे आहे का अशी स्वतःहून विचारणा केल्याने तिच्या मनात लज्जा उत्पन्न झाली. या प्रकाराची माहिती पिडीत महिलेने तिच्या पतीला दिली असता तिच्या पतीने संशयित अनोळखी इसमाचा या प्रकाराबाबत विचारणा केली असता संशयित इसमाने पिडीत महिला रुग्णाला आणि तिच्या पतीला शिवीगाळ करून दोघांनाही हाताने मारहाण केली आणि वॉर्डात धुमाकूळ घातला. या प्रकारामुळे वॉर्डातील उपचार घेणाऱ्या इतर रुग्णांत देखील घबराट पसरली.

Web Title: Female patient molested in hospital

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here