अहिल्यानगर: गुंगीचे औषध देऊन महिला डॉक्टरवर अत्याचार
Breaking News | Ahilyanagar Crime: चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन ३३ वर्षीय महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटन, फोटो व्हायरल करण्याची धमकी.

अहिल्यानगर : चॉकलेटमध्ये गुंगीचे औषध देऊन ३३ वर्षीय महिला डॉक्टरवर अत्याचार केल्याची घटना समोर आली आहे. हा प्रकार मार्च ते ऑक्टोबर २०२५ दरम्यान घडला. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात गुरुवारी (दि. ९) अत्याचाराचा गुन्हा दाखल झाला.
इरफान शेख (पूर्ण नाव माहित नाही, रा. बंगाल चौकी, माळीवाडा) असे गुन्हा दाखल झालेल्या इसमाचे नाव आहे. आरोपी हा महिला डॉक्टरला वेळावेळी दवाखान्यात बोलावून घेत असे.
दवाखान्यात असताना आरोपीने गुंगी येणारे औषध देऊन महिलेवर वेळोवेळी अत्याचार केला. तसेच त्यांच्यासोबत अश्लील फोटो व व्हीडिओही काढले. या फोटोचा वापर त्याने महिलेला धमकी देण्यासाठी केला. माझ्यासोबत लग्न कर नाही, तर अश्लील फोटो तुझ्या नातेवाइकांना दाखवून तुझी बदनामी करीन, अशी धमकी दिली. लग्नास नकार दिल्याने आरोपीने महिलेला जिवे मारण्याची धमकी दिली. महिलेने तोफखाना पोलिस ठाण्यात येऊन आरोपीविरोधात फिर्याद दिली. त्यावरून अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्यात आला आहे. अधिक तपास पोलिस उपनिरीक्षक पी. बी. दळवी करत आहेत.
Breaking News: Female doctor assaulted by giving her a narcotic medicine
















































