Home संगमनेर संगमनेर: मुलासह वडीलांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

संगमनेर: मुलासह वडीलांना मारहाण, चौघांवर गुन्हा दाखल

Breaking News | Sangamner: चार जणांनी येवून लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केल्याची घटना.

Father and son were beaten up, a case was registered against four

संगमनेर:  संगमनेर शहरात मंगळवारी रात्री गणपती विर्सजनाची धुम सुरु असताना नाशिक-पुणे महामार्गावर रामनगर, पाण्याच्या टाकीजवळ राहणार्या राजेंद्र कोंडाजी आव्हाड व त्यांचा मुलगा धनंजय आव्हाड यास चारजणांनी येवून लोखंडी पाईपाने बेदम मारहाण केली. या मारहाणीत दोन्ही बाप-लेख जखमी झाले असून शहर पोलीस ठाण्यात चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी रात्री ९ च्या सुमारास घडली.

फिर्यादी राजेंद्र आव्हाड हे रात्री आपल्या घरासमोर रस्त्यावर उभे असताना आरोपी आकाश घुले, शुभम घुले (रा. पावबाकी), स्वप्निल धात्रक, सोनु चव्हाण दोघेही रा. जय जवान चौक, हे चौघे फिर्यादीचा मुलगा धनंजय यास मारहाण करत होते. मुलाला मारहाण होताना पाहून राजेंद्र आव्हाड मधे पडले असताना, आरोपी स्वप्निल धात्रक याने त्याच्या हातातील टणक पाईपने गुडघ्याच्या खाली वार केला. तर मुलगा धनंजय यास स्वप्निल धात्रक याने त्याचे हातातील टणक पाईप त्याचे डोक्यात मारला व इतर तिघांनी लाथाबुक्यांनी मारहाण करुन शिवीगाळ दमदाटी करुन निघुन गेले.

याप्रकरणी वरील चौघांच्या विरुद्ध राजेद्र कोंडाजी आव्हाड यांनी फिर्याद दाखल केली असून भारतीय न्याय संहिता (बी एन एस), २०२३ अन्वये कलम ११५, ३५२, ३५१(२), ३५२ प्रमाणे संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक रविंद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास ठाणे अंमलदार सुजाता थोरात या करीत आहे.

Web Title: Father and son were beaten up, a case was registered against four

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here