Home पुणे गणपती विसर्जनप्रसंगी बाप लेकाचा बुडून मृत्यू

गणपती विसर्जनप्रसंगी बाप लेकाचा बुडून मृत्यू

Pune Crime News: बाप लेकाचा विसर्जन करतांना पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाल्याची घटना.

Father and daughter drowned during Ganapati immersion

पुणे: सध्या गणेशोत्सव सुरु असून सर्वत्र या उत्सवाचा जल्लोष सुरु आहे. असे असताना एक हृदयद्रवक घटना समोर आली आहे. पुण्यातील मावळ तालुक्यातील ही घटना असून या ठिकाणी एका कुटुंबावर काळाने घातला आहे. मावळ तालुक्यातील कडधे गावात शिर्के कुटुंबासोबत ही दुःखद घटना घडली आहे. या ठिकाणी घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गेलेल्या शिर्के बाप लेकाचा विसर्जन करतांना पाय घसरल्याने पाण्यात पडून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सायंकाळी 5 वाजता ही घटना घडली आहे.

राज्यात सध्या गणेशोत्सवाती धूम सुरु आहे. पुणे जिल्ह्यातही या उत्सवाचा जल्लोष गगनाला भिडला आहे. अशात गणेशोत्सवाच्या पाचव्या व सहाव्या दिवशी अनेक जण आपल्या घरगुती गणपतीला निरोप देतात. पुण्यातील मावळ तालुक्यातील कडधे गावातही साहाव्या दिवशी घरगुती गणपतीला निरोप देण्यात आला. मात्र, या दरम्यान एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. कडधे गावात विसर्जन करण्यासाठी गेलेल्या बाप लेकाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. विसर्जन करतांना पाय घसरल्याने हे दोघं बाप-लेकं पाण्यात बुडाले. दरम्यान, दोघांचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात आले आहे. दोघ मयत हे बेडसे गावातील रहिवासी आहेत. संजय धोंडू शिर्के (वय 45) व हर्षल संजय शिर्के (वय 22) असे बुडून मृत्युमुखी पडलेल्या बाप-लेकाचे नाव आहे.

या घटनेची माहिती मिळताच कामशेत पोलिसांनी घटनास्थळ गाठत पंचनामा केला. तसेच दोघं मयताचे मृतदेह पाण्यातून बाहेर काढले. या दरम्यान, वन्यजीव रक्षक मावळ संस्था व शिवदुर्ग मित्र मंडळ, लोणावळाचे सदस्य, निलेश गराडे, संतोष दहिभाते, शुभम काकडे, रमेश कुंभार, शत्रुघ्न रासनकर, ओंकार कालेकर यांच्यासह ग्रामस्थांनी मदतकार्य केले.

Web Title: Father and daughter drowned during Ganapati immersion

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here