अहमदनगर ब्रेकिंग: शेतातील वेश्या व्यवसायावर छापा, परप्रांतीय महिलांची सुटका
Ahmednagar Prostitution Business: गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी ३ फेब्रुवारीला पहाटे एक वाजेदरम्यान छापा (Raid).
राहुरी: राहुरी व सोनई येथील पथकाने संयुक्त कारवाई करून राहुरी तालुक्यातील वांबोरी परिसरातील गुंजाळे येथे काल मध्यरात्री वेश्या व्यवसाय सुरू असलेल्या ठिकाणी छापा टाकला. त्या ठिकाणाहून तीन परप्रांतीय महिलांची सुटका करून एकाला ताब्यात घेतले. या घटनेने तालुक्यात खळबळ उडाली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, उपविभागीय पोलिस अधिकारी संदीप मिटके यांना गुप्त खबऱ्यामार्फत वेश्या व्यवसायाची माहिती मिळाली होती. त्यांनी दिलेल्या आदेशानुसार राहुरी व सोनई येथील पोलिस पथकाने राहुरी तालुक्यातील वांबोरी ते पांढरी पूल रोडवर गुंजाळे गावचे परिसरात एका शेतात ३ फेब्रुवारीला पहाटे एक वाजेदरम्यान छापा टाकला. त्यावेळी पथकाने एका इसमाला बनावट ग्राहक बनवून पाठविले आणि वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री करून घेतली. त्यावेळी पोलिस पथकाने तेथे छापा टाकून तीन परप्रांतीय महिलांची वेश्या व्यवसायातून सुटका करून दिली. तसेच वेश्या व्यवसाय चालविणारा रवी ऊर्फ संजय गायकवाड याला ताब्यात घेतले आहे. पोलिस नाईक रमेश शिंदे यांच्या फिर्यादीवरून आरोपी रवी ऊर्फ संजय राजू गायकवाड (रा. गुंजाळे) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस करीत आहे.
Web Title: Farm prostitution Business raids, release of migrant women
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App