इंजीनियर प्रेयसी धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसून सीए प्रियकराशी अश्लील चाळे, चित्रफीत प्रसारित अन….
Breaking News | Nagpur Crime: प्रेयसी धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसून कार चालविणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करीत असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित.
नागपूर : प्रेयसी धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसून कार चालविणाऱ्या प्रियकराशी अश्लील चाळे करीत असल्याची एक चित्रफीत समाजमाध्यमावर प्रसारित झाली. पुढे ती पोलीस आयुक्तांपर्यंत पोहचली. आयुक्तांनी प्रेयसी-आणि प्रियकराचा शोध घेण्याचे आदेश दिल्याने सीताबर्डी पोलिसांनी प्रेमीयुगुलाविरुद्ध गुन्हा दाखल केला.
याबाबत माहिती अशी की, आरोपी सूरज हा सनदी लेखापाल (सीए) तर त्याची प्रेयसी अभियंता आहे. दोघांचेही गेल्या दोन वर्षांपासून प्रेमसंबंध आहेत. दोघांनाही सोबत फिरायला जायची सवय होती. सोमवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास सूरज हा प्रेयसीसोबत कारने प्रतापनगरातील एका दुकानात मिसळ खाण्यासाठी जात होता. मात्र, शंकरनगर ते लक्ष्मीनगर चौकापर्यंतच्या रस्त्यावरून कार धावत असताना त्याच्या प्रेयसीने अचानक त्याच्याशी अश्लील चाळे करण्यास सुरुवात केली. काही मिनिटातच ती धावत्या कारच्या स्टेअरिंगवर बसली. तिने प्रियकराशी अश्लील चाळे सुरु केले. हा सर्व प्रकार रस्त्यावरील अन्य वाहनचालक बघत होते. मात्र, दोघांना काहीही फरक पडत नव्हता. या दरम्यान, एक पत्रकारही त्याच रस्त्याने जात होता. त्याच्या लक्षात हा प्रकार आला. त्याने मोबाईलने प्रेमीयुगुलाच्या चाळ्यांची चित्रफीत तयार केली. ती चित्रफीत इंस्टाग्रामवर प्रसारित केली. काही मिनिटातच ती शहरातील अनेकांच्या मोबाईलवर बघितल्या गेली. अनेकांनी या प्रकाराबाबत रोष व्यक्त केला.
अश्लील चाळ्याची चित्रफित पोलीस आयुक्त आणि उपायुक्तांपर्यंत पोहचली. पोलिसांनी गांभीर्याने दखल घेऊन आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आरोपी युवक सूरज हा झिंगाबाई टाकळी परिसरातील रहिवासी आहे. चित्रफितीमध्ये दिसत असलेल्या कारच्या क्रमांकावरून त्याचा पोलिसांनी शोध घेतला. सायंकाळी त्याला ताब्यात घेण्यात आले. त्याच्यावर गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. तर त्याच्या प्रेयसीला बुधवारी सकाळी ताब्यात घेण्यात येणार आहे. (Arrested lover)
धक्कादायक प्रकार!
कारचालक सूरजने काही अंतरावर गेल्यानंतर रस्त्याच्या कडेला कार थांबवली. कारमधील म्युझिकचा आवाज मोठा केला. त्यानंतर दोघांनी रस्त्याच्या कडेला उभ्या कारमध्येच संबंध प्रस्थापित केले. काही युवकांनी कारच्या काचामधून चित्रिकरण केले. काही वेळानंतर दोघेही कार घेऊन तेथून निघून गेले. मात्र, तापर्यंत दोघांचेहे फोटो आणि व्हीडिओ समाजमाध्यमांवर प्रसारित झाले होते. सूरजला पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर विचारणा केली असता, प्रेयसीच्या भावनांवर नियंत्रण न राहिल्यामुळे हा प्रकार घडला. कुणीतरी मोबाईलने छायाचित्र काढत असल्याचे लक्षात आले नाही, असे त्याने सांगितले.
Web Title: Engineer girlfriend has sex with CA boyfriend while sitting on the steering
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study