अहमदनगर जिल्ह्यात या तालुक्यात म्युकरमायकोसिसचे आठ रुग्ण
कोपरगाव | Kopargaon: कोपरगाव तालुक्यात म्युकरमायकोसिसचे आठ रुग्ण आढळून आल्याची ,माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. कृष्णा फुलसौंदर यांनी दिली आहे.
टास्क फोर्स समिती स्थापन करण्यासाठी बोलाविलेल्या बैठकीत डॉ. फुलसौंदर म्हणाले, ज्या व्यक्तींना म्युकरमायकोसिसचे झाल्याचे आढळले ते सर्व प्रौढ आहेत. कोविड बरा झाल्यानंतर दोन महिन्यानंतर ज्यांची साखर कमी होत आहे. अशा रुग्णांची प्रतिकारशक्ती कमी होत असून त्रास संभवत आहे. अशा रुग्णांसाठी ओपीडी सुरु करण्यात येणार असून काही बेड राखीव ठेवण्यात येणार आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने जिल्ह्यात जे थैमान मांडले ते अजूनही कमी झाले नाही. अडीच महिन्यात तब्बल दीड लाख रुग्णांना बाधा झाली. सुमारे २ हजार जणांचा मृत्यू झाला.
Web Title: Eight patients with mucomycosis in Kopargaon taluka