Home नाशिक धरणात उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या, माझा शेवटचा  कॉल असे सांगून….

धरणात उडी घेऊन शिक्षकाची आत्महत्या, माझा शेवटचा  कॉल असे सांगून….

Breaking News | Nashik Suicide: चणकापूर धरणात सटाणा येथील शिक्षकांने उडी घेत जीवन संपवल्याची घटना.

Teacher committed suicide by jumping into a dam

नाशिक | कनोशी: कनोशी तालुक्यातील चणकापूर धरणात सटाणा येथील शिक्षकांने उडी घेत जीवन संपवल्याची घटना रविवारी (दि.15) घडली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

विलास केशवराव कापडणीस (रा हौसिंग सोसायटी, नामपूर रोड, ता सटाणा जि नाशिक) असे मृत शिक्षकाचे नाव आहे. फोटो व्हायरल करण्याची धमकी; विद्यार्थिनीने जीवन संपवले याबाबत अधिक माहिती अशी कि, चणकापूर धरणाच्या आउटलेट क्रमांक १३५ च्या गेट जवळ रविवारी (दि.15) एका इसमाने उडी घेतल्याची माहिती समोर आली होती. धरणानजीक (एमएच ४१ एपी ४३१६) क्रमांकाची दुचाकी, चपला, मोबाईल अशा वस्तू आढळून आल्या. त्यामुळे कोणीतरी धरणात उडी मारून जीवन संपवल्याच्या शंका बळावल्या. यानंतर अभोणा पोलीसांनी शोध सुरु केले. परंतु त्यांना यश आले नाही म्हणून त्यांनी मदतीसाठी मालेगाव येथील अग्निशमन दलाला पाचारण केले होते.

त्यामुळे दुसऱ्या दिवशीही शोधकार्य सुरु ठेवल्यानंतर सोमवारी (दि.१६) सकाळी विलास केशवराव कापडणीस (वय ३८) शिक्षक यांचा मुतदेह मिळून आला आहे. म्हणून चणकापूरचे पोलीस पाटील नंदू देवराम जगताप यांचे खबर नुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

सहाय्यक पोलीस निरीक्षकी यशवंत शिंदे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार चौधरी, एस डी बोरसे तपास करीत आहेत. दरम्यान विलास केशवराव कापडणीस यांनी त्यांचे भ्रमणध्वनी वरून त्यांची पत्नी दिपाली विलास कापडणीस यांना मी चणकापूर धरणावर आलो आहे. व हा माझा शेवटचा कॉल आहे असे सांगून कॉल कट केला असे समजते.

Web Title: Teacher committed suicide by jumping into a dam

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here