Home अहिल्यानगर श्रीरामपुरातून ड्रग्जचा पुरवठा, चौघांना बेड्या

श्रीरामपुरातून ड्रग्जचा पुरवठा, चौघांना बेड्या

Breaking News | Ahilyanagar: औषधनिर्माता असलेला तरुण आता मेफेड्रोन तस्करीत सक्रीय असल्याची धक्कादायक बाब नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) काठे गल्ली सिग्नल परिसरातून उघड केली.

Drug supply from Srirampur, four arrested

नाशिक:  व्यवसायाने फार्मासिस्ट अर्थात औषधनिर्माता असलेला तरुण आता मेफेड्रोन तस्करीत सक्रीय असल्याची धक्कादायक बाब नाशिक शहर गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथकाने (एनडीपीएस) काठेगल्ली सिग्नल परिसरातून उघड केली आहे. मध्यरात्री पथकाने सापळा रचून 6.5 ग्रॅम मेफेड्रोनसह (एमडी) चौघांना बेड्या ठोकल्या आहेत. त्यापैकी एकजण औषधनिर्माता असून, दुसरा मार्केटिंग व्यवसायात कार्यरत आहे. त्यांनी श्रीरामपूरमधून एमडी आणले असून, मुंबई नाका पोलिसांत सात जणांवर गुन्हा नोंद झाला आहे.

एनडीपीएसचे अंमलदार बाळासाहेब नांद्रे यांच्या फिर्यादीनुसार मुंबई नाका पोलिसांत संशयित फैज शब्बीर शेख (वय 22, रा. पखालरोड), कार्तिक भगवान दांदडे (23, रा. द्वारका), अदनान नूरकलाम खाटीक (21, रा. पखालरोड), ताजुद्दीन मोहम्मद रिजवान राईन (20, रा. सात्विकनगर), अदनान अन्सारी, शादाब (रा. वडाळा, नाशिक), सोहेल जुबेर शेख (रा. श्रीरामपूर, अहिल्यानगर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. नांद्रे यांना मिळालेली गोपनीय माहिती, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुशिला कोल्हे यांना कळविण्यात आली.

Breaking News: Drug supply from Srirampur, four arrested

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here