अकोले: भंडारदरा धरणातून पिण्याचे आवर्तन सुरू
Akole News: पिण्याच्या पाण्याचे आवर्तन १४०० क्युसेक वेगाने सोडण्यात आले.
अकोले: तालुक्यातील निळवंडे धरणातून रविवारी (दि.५) सकाळी ९:३६ वाजता पिण्याच्या पाण्याचे आवर्तन १४०० क्युसेक वेगाने सोडण्यात आले आहे. या पिण्याच्या पाण्याच्या आवर्तनात साधारण ५०० दशलक्ष घनफूट पाणी वापरात येईल, असे जलसंपदाच्या सूत्रांनी सांगितले.
भंडारदरा धरण लाभक्षेत्रातील गावांसाठी पिण्याच्या पाण्याचे आवर्तन सोडण्यात आले आहे. भंडारदरा धरणातून पाणी निळवंडेत येते. पुढे निळवंडेतून लाभक्षेत्रासाठी सोडले जाते. पाच दिवस हे आवर्तन सुरू राहणार आहे. भंडारदरातून वीज निर्मिती टनेलमधून ८२० क्युसेकने पाणी निळवंडेत सोडले आहे. तर ३५० क्युसेक रेडिएल गेट मधून व उच्चस्तरीय कालवे गेट मधून ३५० क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे.
डाव्या कालव्यातून देखील पाणी वाहताना दिसून आले. लाभक्षेत्रातील गावातील गावकऱ्यांच्या मागणी नुसार नियोजित पिण्याच्या पाण्याचे आवर्तन प्रवरा नदी पात्रातून सोडण्यात आले आहे.
Web Title: Drinking cycle started from Bhandardara Dam
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App