संगमनेर: हॉटेल व्यावसायिकांकडे घरगुती गॅसच्या टाक्या, कारवाई २० गॅस टाक्या जप्त
Sangamner News: अन्नधान्य वितरण विभागाने छापे (Raid) टाकले असता घरगुती गॅसच्या टाक्यांचा व्यावसायिक कारणासाठी वापर.
संगमनेर: घारगाव येथील व्यावसायिकांवर अन्नधान्य वितरण विभागाने छापे टाकले असता घरगुती गॅसच्या टाक्यांचा व्यावसायिक कारणासाठी वापर होत असल्याचे समोर आले आहे. या कारवाईत २० गॅस टाक्या जप्त करण्यात आल्या आहेत. प्रांताधिकारी शैलेश हिंगे, तहसीलदार धीरज मांजरे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी ही कारवाई करण्यात आली.
याबाबत अधिक माहिती अशी की, हॉटेल व्यावसायिकांकडे व्यावसायिक गॅस टाक्यांऐवजी घरगुती गॅसच्या टाक्या वापरल्या जात असल्याच्या तक्रारी नायब तहसीलदार उमाकांत कडनोर यांना येत होत्या. त्यांच्या आदेशानुसार अन्नधान्य वितरण विभागाचे पुरवठा निरीक्षक गणेश भालेराव यांनी घारगाव परिसरात मंगळवारी विविध ठिकाणी छापे टाकले. यात जिव्हाळा चायनीज सेंटर (नऊ टाक्या), लक्ष्मी ढाबा (दोन टाक्या), मांडे वडेवाले (एक टाकी), साईकृपा मिसळ हाऊस (दोन टाक्या) अमृत सरोवर (दोन टाक्या), अशोक फरसाण (एक टाकी), श्री दत्त हॉटेल अॅण्ड बेकरी (दोन टाक्या), हॉटेल श्रीदत्त भवन (एक टाकी) या व्यावसायिकांकडे २० घरगुती टाक्या मिळून आल्या. या टाक्या जप्त केल्या असून पुढील कारवाई करण्यात येणार असल्याचे नायब तहसीलदार कडनोर यांनी सांगितले.
Web Title: Domestic gas tanks from hoteliers, Raid action 20 gas tanks confiscated
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App