डॉक्टर अरुण इथापे यांना अटकपूर्व जामीन मंजूर
Sangamner: सीसीटीव्ही फुटेज तपासून टोल नाक्याचे फुटेज तपासून सदर प्रकरणांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीनाला मंजुरी (Doctor Arun Ethape granted anticipatory bail).
संगमनेर: गेल्या महिन्यात संगमनेर येथील डॉक्टर इथापे यांच्या विरोधात संगमनेर पोलीस स्टेशनमध्ये विविध कलमानुसार गुन्हे दाखल झालेले होते. त्याच अनुषंगाने डॉक्टर इथापे यांच्या वतीने तसेच त्यांच्या कुटुंबीयांच्या वतीने तसेच अॅडव्होकेट अतुल आंधळे यांच्या संगमनेरच्या न्यायालयामध्ये अटकपूर्व जामीनासाठी अर्ज करण्यात आलेला होता. त्या अर्जाचा विचार करता संगमनेर येथील माननीय न्यायालयाने सर्व प्रथमदर्शनी पुराव्यांची शह निशा करता तसेच सीसीटीव्ही फुटेज तपासून टोल नाक्याचे फुटेज तपासून सदर प्रकरणांमध्ये अंतरिम अटकपूर्व जामीनाला मंजुरी दिली आहे. त्यामुळे एकूणच डॉक्टर इथापे आणि इथापे कुटुंबाला दिलासा मिळाला आहे.
Business Idea | पाच हजार रुपयांच्या गुंतवणुकीत कमवा बक्कळ पैसा | Earn Money from Business
भारतीय दंड संहितेच्या कलम ५०९, ३५४ (अ) तसेच. बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंध चे कायदा पोस्को नुसार डॉक्टर इथापे यांच्या विरोधात संगमनेर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. मात्र पोलिसांनी केलेल्या तपासात अंतर्गत कुठल्याही प्रकारचं गैर्य कृत्य आढळले नसल्याचे सीसीटीव्ही फुटेज मध्ये दिसत असल्यामुळे हा अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात येत असल्याचे माननीय न्यायालयाने सांगितले आहे.
Web Title: Doctor Arun Ethape granted anticipatory bail
See Latest Marathi News, Ahmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App