Home अहिल्यानगर जिल्हा रुग्णालय आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे आहे कारण

जिल्हा रुग्णालय आरोग्य कर्मचाऱ्यांचे आंदोलन हे आहे कारण

district hospital health workers' movement

अहमदनगर: जिल्हा रुग्णालयाच्या आवारात आरोग्य कर्मचारी व सर्वानांच वाहने लावण्यास बंदी करण्यात आल्यामुळे रस्त्यावर वाहने उभी करावी लागतात. रस्त्यावरून वाहने चोरी जाण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे वाहनांना सुरक्षित जागा हवी या मागणीसाठी जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी आज सकाळी आंदोलन केले आहे. या योद्ध्यांना वाहनांच्या सुरक्षितेसाठी आंदोलन करण्याची वेळ आली आहे,

हे आंदोलन सोमवारी सकाळी करण्यात आले. पोलीस अधिकाऱ्यांनी हस्तक्षेप करत वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा करून मार्ग काढू असे आश्वासन देण्यात आले आहे.

जिल्हा शल्यचिकित्सकांना निवेदन देण्यात आले. यात नमूद करण्यात आले आहे की,  सध्या जिल्हा रुग्णालयातील कर्मचारी करोना रुग्णांवरील उपचार व काम करावे लागत आहे. बऱ्याच कर्मचाऱ्यांची घरे दूर आहेत. सार्वजनिक वाहतुकीची सोय नसल्याने खासगी वाहनाशिवाय पर्याय नाही. त्यामुळे त्यांना आपले वाहन घेऊन यावे लागते. मात्र, जिल्हा रुग्णालयाच्या आवारात बंदी असल्याने त्यांना असुरक्षितपणे वाहन रस्त्यावरच उभे करावे लागत आहे. बाहेर वाहनाचे नुकसान अगर चोरी झाल्यास कोणाला जबाबदार धरण्यात यावे? त्यास जबाबदार कोण असणार? आम्ही सर्व अधिकारी तथा कर्मचारी प्रशासनाला कायम सहकार्य करत आहोत. त्यामुळे प्रशासनानेही याचा सहानुभूतीपूर्वक विचार करावा. यापूर्वी करण्यात आलेला दंड रद्द करण्यात यावा. वाहनांसाठी सुरक्षित जागा मिळावी आणि कर्मचाऱ्यांना तणावमुक्त काम करता यावे, असे वातावरण व्हावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

Web Title: district hospital health workers’ movement

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here