Home अकोले अकोले: कळसूबाई शिखर सर करताना तरुणाचा मृत्यू

अकोले: कळसूबाई शिखर सर करताना तरुणाचा मृत्यू

Breaking News |  Akole: एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना.

Death of young man while climbing Kalsubai Shikhar

राजूर : कळसूबाई शिखर सर करत एका तरुणाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. गुजरात येथील नेमीन नरेशभाई पटेल (वय २३, रा बलसाड) याचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची घटना रविवारी दुपारी घडली.

बलसाड (गुजरात) येथील काही मुलांचा ग्रुप कळसूबाई शिखरावर चढाई करण्यासाठी रविवारी आला होता. सर्व मित्र कळसूबाई शिखर सर करत असताना नेमीन याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांना घटनेची माहिती समजतात सहाय्यक पोलिस निरीक्षक दीपक सरोदे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस हेडकॉन्स्टेबल दिलीप डगळे व इतर घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी त्याचा मृतदेह पायथ्याशी आणला. दोन दिवसांपूर्वी भंडारदरा धरणात पोहोण्यासाठी गेलेल्या शिर्डी येथील तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली असताना आणखी एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.

Web Title: Death of young man while climbing Kalsubai Shikhar

See also: Latest Marathi News,  Breaking News live,  Education Study

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here