पेरू तोडण्यासाठी गेलेल्या माय लेकीचा शॉक लागून दुर्दैवी मृत्यू, जावई, दोन मुले बचावले
Nashik: गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी अन् मुलीला डोक्यावर असलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना.
ओझर | नाशिक : ओझर येथील दत्तनगर मधील वसाहतीत भाडेकरू म्हणून राहणाऱ्या कुटुंबावर काळाने घाला घातला आहे. गच्चीवर पेरू तोडण्यासाठी गेलेल्या त्यांच्या पत्नी अन् मुलीला डोक्यावर असलेल्या हाय टेन्शन वायरचा शॉक लागून जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, घरावरच्या गच्चीतील पेरू तोडत असताना हातातील रॉड हा हा टेन्शन वायरला लागल्याने मीना हनुमंत सोनवणे, आकांक्षा राहुल रणशूर या माय लेकिंचा जागीच मृत्यू झाला. पती राहुल रणशूर व त्यांच्या दोन बालकांना शॉक मुळे लांब फेकल्याने ते बचावले. सदर घटना आज रविवारी दुपारी दीड वाजेच्या सुमारास घडली. राहुल रणशूर यांनी गच्चीवरून आरडाओरड केल्याने कॉलनीतील लोकांनी धाव घेतली पण गच्चीतील पाण्याची टाकी फुटल्याने पूर्ण बंगल्यात वीज प्रवाह उतरला होता.
ओझर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत मृतदेह पंचनामा करून शवविच्छेदन साठी पिंपळगाव येथे पाठवले असून सायंकाळी उशिरा मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात येतील. पुढील तपास ओझरचे पोलीस निरीक्षक दुर्गेश तिवारी हे करीत आहे.
Web Title: Death of my daughter due to Electric shock
See also: Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App