संगमनेर: अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळला, आठवड्यात तीन मृतदेह
Breaking News | Sangamner: गेल्या सात दिवसांत संगमनेर तालुक्यात तीन मृतदेह (Dead body) आढळले.
संगमनेर: गेल्या सात दिवसांत संगमनेर तालुक्यात तीन मृतदेह आढळले आहेत. यामुळे एकच खळबळ उडाली आहे. नुकताच रायते गावातील चौफुलीजवळ एका विहिरीत अनोळखी इसमाचा मृतदेह आढळला आहे.
दरम्यान, पठारभागातील वरुडी पठार येथे सात दिवसांपूर्वी एका अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. अजूनही त्याची ओळख पटलेली नसून पोलीस तपास करत आहेत. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी साकूर येथे एका कारमध्ये मृतदेह आढळला होता. मात्र, त्याची ओळख पटली होती. आता पुन्हा रायते गावातील एका विहिरीत अंदाजे ३५ ते ४० वयाच्या इसमाचा मृतदेह आढळून आला आहे. त्याच्या अंगात काळ्या रंगाचा सदरा असून त्यावर लाल रंगाच्या चौकटी दिसत आहते. तसेच निळ्या रंगाची जिन्स पॅन्ट घातलेली दिसत आहे. या घटनेची माहिती मिळताच संगमनेर शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली आहे. वरील वर्णनानुसार मृतदेहाची ओळख पटवण्याबाबत पोलिसांनी आवाहन केले आहे.
Web Title: Dead body of an unknown person was found
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study