Home संगमनेर संगमनेर: अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

संगमनेर: अज्ञात इसमाचा आढळला मृतदेह

Sangamner Dead Body Found:  पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वरची माहुली परिसरात महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला.

Dead body of an unknown person was found

संगमनेर: संगमनेर तालुक्याच्या पठार भागातील पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावर वरची माहुली परिसरात महामार्गालगत अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. ही घटना बुधवारी (दि. ७ डिसेंबर) सकाळी उघडकीस आली.

याबाबत घारगाव पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील वरची माहुली शिवारातील नवीन घाटात अज्ञात इसमाचा मृतदेह आढळून आला. मळकट कपडे व राखाडी रंगाचा स्वेटर या इसमाच्या अंगात असून, तो अंदाजे ४० ते ४५ वर्षे वयाचा आहे. सकाळच्या वेळेस दूध घालणाऱ्या व्यक्तींच्या लक्षात ही गोष्ट येताच त्यांनी डोळासणे गावचे पोलिस पाटील राजेंद्र सूर्यवंशी यांना याबाबतची माहिती दिली. पोलिस पाटील सूर्यवंशी यांनीही तातडीने घटनास्थळी जाऊन पाहणी केली मात्र, त्या इसमाची ओळख पटली नाही.

Business Idea in Marathi | कमी खर्चात घरबसल्या करता येणारे नवीन बिजनेस | Low Investment Business

याबाबतची माहिती घारगाव पोलिसांना देण्यात आली. घटनेची माहिती समजताच पोलिस हेड कॉन्स्टेबल आदिनाथ गांधले यांनी घटनास्थळी धाव घेतली. मृतदेहाचा पंचनामा करत मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी संगमनेर येथील कुटीर रुग्णालयात पाठविण्यात आला. पोलिस पाटील सूर्यवंशी यांनी दिलेल्या खबरीवरून घारगाव पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

Web Title: Dead body of an unknown person was found

See Latest Marathi NewsAhmednagar News, and Download Now Sangamner Akole News Ahmednagar Live App 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here