संगमनेर तालुक्यातील पठार भागात वादळी वाऱ्यामुळे पिके, घरे दुकानांचे मोठे नुकसान
संगमनेर | Sangamner: संगमनेर तालुक्यातील पठार भागात रविवारी दुपारी ३.३० च्या सुमारास अचानक जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाला जोरदार सुरुवात झाल्याने पिके, घरे, दुकानांचे मोठे नुकसान झाले असून काही ठिकाणी गारपीट झाली आहे. शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची भरपाई मिळावी अशी मागणी शेतकरी ग्रामस्थांकडून होत आहे.
तालूक्यातील पठार भागात दोन दिवस वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान केल्याने शेतकरी अडचणीत सापडला आहे. रविवारी सकाळीच उन्हाचा तडाखा आणि उकाडा जाणवत होता. दुपारच्या सुमारास गुंजाळवाडी पठार, कर्जुले पठार, सारोळे पताहर, सावरगाव घुले, डोळसणे आदी भागांत जोरदार वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. गुंजाळवाडी पठार गावातील काटवनवाडी येथील प्रशांत बाळू दुधवडे याचे घर वादळी वाऱ्याने उद्वस्त झाल्याची घटना घडली आहे. संपूर्ण संसार उघड्यावर पडला असून धान्य भिजले आहे. तसेच वरुडी फाटा येथे शंकर घुले यांचे पत्र्याचे शेड वाऱ्याने उडून महामार्गावर पडले. कृष्णा दिवेकर यांच्या दुकानाचे पत्रे उचकटून नुकसान झाले आहे. या नुकसानीबाबत प्रशासनास कळविण्यात आले आहे. सर्व नुकसानग्रस्त यांना भरपाई मिळावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.
Web Title: damage to crops, houses and shops due to strong winds in Sangamner