Crime News: लॉजवर वेश्या व्यवसायावर छापा: दोन तरुणींची सुटका
अहमदनगर | Crime News: शहरातील औरंगाबाद रोड वरील यशांजली लॉजवर वेश्या व्यवसाय सुरु असताना तोफखाना पोलिसांनी छापा टाकला आहे. या छाप्यात दोन तरुणींची तरुणींची सुटका करण्यात आली आहे. याप्रकरणी लॉज मालक व मॅनेजर विरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
राजू सौदे व संजय गाडे (रा. गोविंदपुरा) असे गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत.
हंसने-हंसाने का ये सिलसिला… पढिये डेली टॉप 5 – हिंदी जोक्स
यशांजली लॉजवर वेश्या व्यवसाय सुरू असल्याची माहिती शहर पोलीस उपअधीक्षक अजित पाटील यांना मिळाली होती. त्यानुसार तोफखाना पोलिसांना कारवाईच्या सूचना करण्यात आल्या. पोलीस निरीक्षक ज्योती गडकरी यांच्या पथकाने लॉजवर छापा टाकत दोन तरुणींची सुटका केली आहे.
Web Title: Crime News Raid on the prostitution business at the lodge