संगमनेर शहरात बेकायदेशीर बायोडिझेल विक्री करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई
संगमनेर | Crime News | Sangamner: संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरात शहर पोलिसांनी बेकायदेशीररित्या बायोडिझेलची विक्री सुरू असलेल्या ठिकाणार शहर पोलिसांनी छापा टाकत बायोडिझेल सह विविध वाहने असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज पोलिसांनी जप्त केला. ही कारवाई सोमवारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास करण्यात आली. याप्रकरणी सहा जणांवर कारवाई करण्यात आली आहे.
संगमनेर शहरातील मालदाड रोड परिसरातील तिरंगा चौका लगत बेकायदेशीररित्या बायोडिझेल सदृश ज्वलनशील पदार्थाची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती संगमनेर शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांना माहिती मिळाली. त्यांनी ही माहिती हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांना कळवली. संबंधित खात्याचे कर्मचारी व पंच यांना घेऊन त्वरित घटनास्थळी जाऊन छापा टाका अशा सूचना पोलिस निरीक्षक यांनी दिल्याने पोलीस पथक व पुरवठा विभागाचे अधिकारी दुपारी बारा वाजेच्या सुमारास तिरंगा चौकाजवळ पोहोचले. या ठिकाणी असलेल्या दत्तनगर परिसरातील शंकर उपाध्याय यांच्या मोकळ्या प्लॉटमध्ये त्यांना वेगवेगळी वाहने संशयास्पदरीत्या उभी असल्याचे आढळली. या ठिकाणी चौकशी केली असता बायोडिझेलची बेकायदेशीर विक्री सुरू असल्याची माहिती पोलिसांना समजली.
पोलिसांनी या ठिकाणाहून ३ लाख १० हजार रुपये किमतीची पिकप जीप (क्रमांक एम. एच. 40 डि.एस 7440), एक लाख 72 हजार रुपये किमतीच्या दोन टाक्या व फिल्टर मशीन, सहा लाख 25 हजार रुपये किमतीची आयशर वाहन (क्रमांक एम. एच. 17 बी वाय 5245) असा एकूण 11 लाख 11 हजार 200 रुपयांचा ऐवज जप्त केला.
याप्रकरणी हेड कॉन्स्टेबल अमित महाजन यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार राहुल रमेश रासकर (वय 27) रा. पावबाकी रोड, मोहम्मद यासीन वाहिद हुसेन रा. उत्तराखंड, सुनील मारुती पावसे, संदीप मारुती पावसे, अण्णासाहेब जाधव रा. हिवरगाव पावसा व गणेश गणेश दादासाहेब सोनवणे रा. वेल्हाळे, संजय पगडाल रा.संगमनेर यांच्याविरुद्ध भादंवि 285, 34, जीवनावश्यक वस्तू कायदा कलम 3 अन्वये गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शिंदे करत आहेत.
Web Title: Crime News Police crack down on illegal biodiesel sellers