संगमनेर: डॉ. पूनम निघुते आत्महत्या प्रकरण: पती डॉक्टरविरोधात गुन्हा दाखल
संगमनेर | Crime News: महिला डॉक्टर पूनम योगेश निघुते वय ३५ रा. ताजणे मळा नवीन नगर रोड संगमनेर यांनी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याप्रकरणी त्यांचे पती डॉ. योगेश यशवंत निघुते रा. ताजणे मळा नवीन नगर रोड संगमनेर यांच्याविरोधात आत्महत्या प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे.
शरद कमलाकर कोलते रा. जालना यांनी फिर्याद दिल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. डॉ. पूनम निघुते यांनी बेडरूममध्ये छताच्या पंख्याला ओढणीच्या साह्याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची नोंद पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.
आई वडिलांकडे वारंवार पैशाच्या मागणीचा तगादा लावून चारित्र्यावर संशय घेऊन पूनम निघुते यांना पती डॉ. योगेश निघुते हा मारहाण करीत असे. तसेच त्यांना आठ वर्षाचा मुलगा असताना देखील आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याचे फिर्यादीत म्हंटले आहे. शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक मुकुंदराव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक पंकज शिंदे हे पुढील तपास करीत आहे.
Web Title: Crime News filed a case against the nighute doctor