संगमनेरला रस्त्यावर वाहने थांबवून अजब प्रकार, सात जणांवर गुन्हा
Breaking News | Sangamner Crime: इसम वाहने थांबवून चालकांना वाहने रस्त्यावर उभी करण्यास सांगून येथून वाहने हलणार नाही, असा दमच देत.
संगमनेर: केंद्र सरकारने नव्याने आणलेल्या ‘हिट अँड रन’ कायद्याविरोधात टँकर चालकांनी काही दिवसांपूर्वी संप पुकारला होता. त्यानंतरही दोन दिवसांपूर्वी अघोषित संप पुकारला होता. यातच संगमनेरात गुरुवारी (११) वेगळाच अजब प्रकार पहावयास मिळाला. अत्यंत रहदारी असणाऱ्या दिल्ली नाका येथे सात इसम वाहने थांबवून चालकांना वाहने रस्त्यावर उभी करण्यास सांगून येथून वाहने हलणार नाही, असा दमच देत होते. याप्रकरणी शहर पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी, की संगमनेर शहरातून नगर व पुणे शहरांकडे जाणाऱ्या रस्त्यांना जोडणाऱ्या दिल्ली नाका येथे गुरुवारी सकाळी अकरा वाजेच्या सुमारास समीर चाँदमिया शेख (रा. नाईकवाडीपुरा, संगमनेर), सलीम उमेद बागवान (रा. चांदवड, जि. नाशिक), तौफिक शेख, शा- हरुख शेख, शकील दबेदार, मुन्ना शेख हे सात जण ये-जा करणाऱ्या वाहनांना थांबवून चालकांना रस्त्यावर वाहने उभी करण्यास भाग पाडत होते. ही वाहने येथेच उभी ठेवा, कोणतेही वाहन हलणार नाही, असा अप्रत्यक्ष दमच देत होते. या प्रकाराची पोलिसांना माहिती कळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत वाहतूक सुरळीत केली.
याप्रकरणी पोलीस कॉन्स्टेबल रोहिदास शिरसाठ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शहर पोलिसांनी वरील सात जणांवर गुन्हा रजिस्टर नंबर १९/२०२४ भारतीय दंड संहिता कलम ३४१, ३४२, ३४ नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली महिला पोलीस जाधव करत आहेत.
Web Title: Crime against seven people who stopped vehicles on Sangamner
See also: Breaking News live, Latest Marathi News, Sangamner News, Ahmednagar News, Education Study, Crime News