दुचाकी-स्कूलबसची धडक, चुलते-पुतणे मृत्युमुखी
Breaking News | Ahmednagar: जोरदार वाऱ्याने रस्त्यावर पडलेले झाड चुकविताना दुचाकी आणि स्कूल बसची धडक झाली. यात चुलत्या-पुतण्याचा मृत्यू.
पाथर्डी : जोरदार वाऱ्याने रस्त्यावर पडलेले झाड चुकविताना दुचाकी आणि स्कूल बसची धडक झाली. यात चुलत्या-पुतण्याचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि.२०) सायंकाळी पाथर्डी तालुक्यातील येळी गावच्या शिवारात कल्याण निर्मळ राष्ट्रीय महामार्गावरील पेट्रोलपंपानजीक घडली.
चुलते प्रकाश पंढरीनाथ ढाकणे (वय ३४) तर पुतण्या मधुकर सुधाकर ढाकणे (वय २६, रा. काटेवाडी) अशी दोघा मृतांची नावे आहेत.
अपघाताची माहिती मिळताच या परिसरात दौऱ्यावर असलेले अॅड. प्रताप ढाकणे यांनी तत्काळ अपघातस्थळी धाव घेतली. त्यांनी प्रकाश ढाकणे, मधुकर ढाकणे यांना पाथर्डीच्या उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविले. मात्र, त्याआधीच त्यांचा मृत्यू झाला होता. उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकारी मनीषा खेडकर यांनी दोघांना मृत घोषित केले.
गेल्या काही दिवसांपासून पाथर्डी तालुक्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाचा कहर सुरु आहे. या परिसरात तीन ते चार दिवसांपूर्वी अवकाळी पाऊस झाला होता. शनिवारी सायंकाळी जोर दार वाऱ्यासह पुन्हा पाऊस झाला. काही ठिकाणी रस्त्यावर झाडेही पडली.
अशेच झाड येळी परिसरात राष्ट्रीय महामार्गावर पडले होते. अचानक पडलेले झाड चुकविताना चुलत्या – पुतण्याला जीव गमवावा लागला.
प्रकाश ढाकणे हे रायगड जिल्ह्यातील कर्जत आगारात एसटी चालक म्हणून कार्यरत होते. त्यांचा पुतण्या मधुकर ढाकणे हा शेती व्यवसाय करत होता.
Web Title: Cousin-nephew killed in two-wheeler-schoolbus collision
See also: Latest Marathi News, Breaking News live, Education Study