Home संगमनेर संगमनेर हादरले! प्रेमीयुगुलांनी वादातून संपवले जीवन ; पत्नीची हत्या ? पतीची आत्महत्या...

संगमनेर हादरले! प्रेमीयुगुलांनी वादातून संपवले जीवन ; पत्नीची हत्या ? पतीची आत्महत्या ?

Breaking News | Sangamner Suicide: प्रेमी युगलांच्या व्यक्तिगत वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाल्याने टोकाचे पाऊल उचल्याने या दुर्घटनेत दोघांची जीवनयात्राच संपली.

Couple ends life over argument Wife murdered  Husband committed suicide

संगमनेर : पठार भागातील सख्ख्या चुलत दोन बहिणीच्या आत्महत्येची ? घटना ताजी असतानाच संगमनेर शहरातील इंदिरानगर परिसरातून एका प्रेमी युगुलाची हत्या ? आत्महत्या ? घडल्याची एक धक्कादायक बातमी समोर आली असून रविवार दिनांक ७ सप्टेंबर रोजी दुपारी जय जवान चौकात राहावयास असलेल्या या प्रेमी युगलांच्या व्यक्तिगत वादाचे रूपांतर कडाक्याच्या भांडणात झाल्याने टोकाचे पाऊल उचल्याने या दुर्घटनेत दोघांची जीवनयात्राच संपली. या घटनेने संगमनेरसह तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये वैष्णवी संजय खांबेकर वय वर्ष 22  (माहेरचे आडनाव )घोडेकर मळा तर तिचा पती कुलदीप सुनील अडांगळे वय वर्ष 35 इंदिरानगर या दोघांचा करूण अंत झाला आहे.

इंदिरानगर येथील घरामध्ये वैष्णवी खाली पडल्याचे तर त्याच ठिकाणी कुलदीप याचा मृतदेह पंख्याला लटकला असल्याचे पोलीस सूत्राकडून समजते. वैष्णवी आणि कुलदीप यांचा दोन वर्षांपूर्वीच प्रेमविवाह झाला होता. परंतु स्वतःच्या वादातून सदरची दुर्दैवी घटना घडली. या घटनेनंतर दोघांना ग्रामीण रुग्णालय घुलेवाडी येथे तपासणीसाठी नेले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. कुलदीपच्या शवाविच्छेदना नंतर काल रविवार दि ७ ला सायंकाळी यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले. तर वैष्णवी संजय खांबेकर हिचा मृतदेह फॉरेन्सिक तपासणीसाठी लोणी प्रवरानगर येथे पाठवण्यात आला. फॉरेन्सिक अहवालानंतर घटनेचा उलगडा होईल. याबाबत शहर पोलिसात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली.

Breaking News: Couple ends life over argument; Wife murdered? Husband committed suicide

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here