Home संगमनेर बनावट नोटा प्रकरण: गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय तपासणी

बनावट नोटा प्रकरण: गुंजाळवाडी ग्रामपंचायत कार्यालय तपासणी

Breaking News | Sangamner Fake currency: बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी मोर्चा आता गुंजाळवाडी ग्रामपंचायतकडे वळवला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पोलिसांनी बनावट नोटासंदर्भात चौकशी.

Counterfeit notes case Gunjalwadi Gram Panchayat office investigation

संगमनेर: संगमनेर शहरानजीक गुंजाळवाडी शिवारातील रजनीकांत रहाणे याच्या बनावट नोटाप्रकरणी पोलिसांनी मोर्चा आता गुंजाळवाडी ग्रामपंचायतकडे वळवला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन पोलिसांनी बनावट नोटासंदर्भात चौकशी केली आहे.

गुंजाळवाडी शिवारात बनावट नोटांची छपाई केली जात असल्याची माहिती दिल्लीच्या गुप्तचर विभागाला मिळाली. त्यांच्या आदेशाने पुणे गुप्तचर विभाग आणि संगमनेर पोलिसांनी गुरुवारी (दि.२०) कारवाई करीत छपाई साहित्यांसह ग्रामपंचायत कर्मचारी रजनीकांत राजेंद्र राहणे याला अटक केली. राहणे गेल्या दहा वर्षापासून गुंजाळवाडी ग्रामपंचायतीमध्ये लिपिक म्हणून काम करीत आहे. ग्रामपंचायतीचे आर्थिक व्यवहार ती सांभाळत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

घटनेच्या दिवशी पोलिसांनी प्रिंटर, नोटा छापायचा कागद, पाचशे व शंभरांच्या चांगल्या व काही खराब नोटा जप्त केल्या. याप्रकरणी संगमनेर शहर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट नोटा प्रकरणी अटक करण्यात आलेल्या रजनीकांत राहणे याला शुक्रवारी (२१) न्यायालयासमोर हजर केले असता पाच दिवसांची २५ फेब्रुवारीपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली. मंगळवारी ही मुदत संपत आहे.

दिल्लीच्या अधिकाऱ्यांनी पुणे गुप्तचर विभागाला माहिती देत कारवाई करण्याचे आदेश दिले होते. पुण्याचे वरिष्ठ गुप्तचर अधिकारी झाकीर हुसेन मुल्ला, उपअधीक्षक डॉ. कुणाल  सोनवणे, शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख, उपनिरीक्षक समीर अभंग, कर्मचारी हरिश्चंद्र बांडे, राहुल डोके, राहुल सारवंदे या सर्वांनी संयुक्तपणे गुंजाळवाडी येथील रहाणे मळ्यातील घरावर गुरुवारी सकाळी छापा टाकला होता.

दरम्यान, रजनीकांत राहणे गुंजाळवाडी ग्रामपंचायत लिपिक या पदावर काम करत आहे. घटना घडलेल्या दिवसांपर्यंत तो ग्रामपंचायतीत काम करत होता. अद्यापही तो ग्रामपंचायतीचा अधिकृत कर्मचारी आहे. शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतरही सरपंच, उपसरपंच व ग्रामसेवकांनी त्याच्यावर अद्याप कुठलीच कारवाई केलेली नाही.

पोलिसांनी ग्रामपंचायत कार्यालयात जाऊन बनावट नोटा प्रकरणी रजनीकांत  राहणेबाबत अधिक तपास केला. रहाणे यनि बनावट नोटा काही चालनात आणल्या होत्या का अथवा ग्रामपंचायतीत बनावट नोटाचे काही माहीती, पुरावे मिळतात का या संदर्भात तपास केला व पुढेही तपास सुरूच राहणार आहे

मात्र, बनावट नोटाबाबत ग्रामपंचायतीमध्ये राहणे याने कुठलेच आक्षेपार्ह काम केल्याचे तपासात आढळून आले नसल्याचे पोलिस निरीक्षक रवींद्र देशमुख यांनी सांगितले. दरम्यान रजनीकांत राहणे याची कोठडी मंगळवारी संपत असल्याने त्याला पुन्हा न्यायालय समोर हजर केले जाणार आहे. राहणे हा गुंजाळवाडी ग्रामपंचायत कर्मचारी आहे. मात्र ग्रामपंचायतीचा या घटनेशी काही संबंध नसल्याची माहिती सरपंच अमोल गुंजाळ यांनी दिली.

Web Title: Counterfeit notes case Gunjalwadi Gram Panchayat office investigation

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here