Home महाराष्ट्र राज्यात ओमिक्रॉन वाढतोय; या जिल्ह्यात देखील शिरकाव

राज्यात ओमिक्रॉन वाढतोय; या जिल्ह्यात देखील शिरकाव

Corona News Update Omicron in Latur

लातूर | Corona News Update Omicron: जगात ओमिक्रॉनने दहशत पसरवली असून लातुरात देखील ओमिक्रॉनने शिरकाव केला आहे. पहिला रुग्ण लातुरात औसा इथल्या  येथे आढळून आला आहे. त्याची प्रकृती चांगली आहे अशी माहिती आरोग्य प्रशासनाने दिली आहे. लातुर जिल्ह्यात आजतागायत 94 पेक्षा अधिक नागरिक विविध देशातून लातुर जिल्ह्यातील विविध भागात आलेले आहेत. आरोग्य विभागाच्या वतीने या प्रवाशांची  कोरोना चाचणी करण्यात येत आहे.

आजतागायत चाचणी केलेल्या नागरिकांपैकी दोन व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह अहवाल आले आहेत. त्यांना ओमीक्रॉन प्रकाराचा व्हेरिएंट आहे का याची पडताळणी करण्यासाठी जिनोम सिक्वेन्सीग साठी नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठवण्यात आले होते. त्या दोन रुग्णांपैकी दुबई येथून आलेला औसा इथल्या रुग्णाला ओमीक्रॉनच्या व्हेरिएंटचा संसर्ग झाला आहे.

Web Title: Corona News Update Omicron in Latur

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here